उत्साही अधिकारी सोडून गेला; सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांचे निधन

उत्साही अधिकारी सोडून गेला; सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांचे निधन

सोलापूर : सोलापूर शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांचे निधन झाले. ते जिम मध्ये व्यायामसाठी गेले असताना त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. चांगल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने पोलीस प्रशासनाला धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. 1988 साली सुहास भोसले यांनी सोलापुरातून पोलीस उपनिरीक्षक पदावरून आपल्या सेवेला सुरुवात केली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असताना सोलापुरातच त्यांचे निधन झाले आहे.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह इतर पोलिस अधिकाऱ्यांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर सुहास भोसले यांना मानवंदना दिली. त्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पुणे येथे रवाना करण्यात आला आहे. भोसले यांच्या निधनानंतर सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. व्हाट्स अप आणि फेसबुकवर अनेकांनी सुहास भोसले यांचे छायाचित्र टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सुहास भोसले हे विभाग १ एक याठिकाणी विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते, जेलरोड पोलीस ठाण्याच्या बाजुला हे कार्यालय होते. १ एप्रिल २०२१ रोजी ते अमरावती हून सोलापूरात जॉईन झाले होते, मृत्यू समयी त्यांचे वय ५६ असून त्यांच्या पश्चात आई,पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूची माहिती कळताच हॉस्पिटलमध्ये पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गर्दी केली होती.

मंगळवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेवेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले हे उपस्थित होते. यावेळी कामगिरी केलेल्या पथकासह सुहास भोसले यांचे शेवटचे छायाचित्र-