Video : 5 ठार; मळीचा टँकर आणि तांदळाच्या ट्रक यांच्यात अपघात

Video : 5 ठार; मळीचा टँकर आणि तांदळाच्या ट्रक यांच्यात अपघात

सोलापूर  : माढा तालुक्यातील भीमानगर पुलाजवळ काल शनिवारी रात्री ११ च्या सुमारास मोठा अपघात झाला. मळीचा टँकर आणि तांदळाच्या ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत पाचजण जागीच ठार झाले तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत.

इंदापूरहून सोलापूरकडे मळीचा टँकर (एम. एच. १४ / सी.पी. ४०२०) निघाला होता. माढा तालुक्यातील भीमा नगर येथे एका पुलाजवळ सरदारजी ढाब्यासमोर टँकर आला. समोरुन येणारा तांदळाचा ट्रक (एम.एच.२५ / यू४०४५) दुभाजकाला धकडून समोरून आलेल्या टँकरवर आदळला.

या अपघातात मळीच्या टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला. ट्रक उलटून चालकाच्या केबीनमधे बसलेले पाचजण जागीच ठार झाले. ट्रकमधील लहान मुलं आणि स्त्रीयांसह तीनजण जखमी झाले असून त्यांना इंदापूर जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील ट्रक हा सोलापूरमधून तांदळाची गोणी घेऊन मुंबईकडे निघालेला होता. या अपघातात दोन लहान मुले, महिला जखमी झाले आहेत. सर्व जखमींची प्रकृती गंभीर आहे. त्यांचावर इंदापूर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Video -