विजापूर रोडवर अपघात; चौघा तरुणांचा मृत्यू

विजापूर रोडवर अपघात; चौघा तरुणांचा मृत्यू

Accident on vijapur Road

सोलापूर : विजापूर येथून सोलापूरकडे येणाऱ्या वाहनाला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

विजापूर रोडवरील कवठे गावाजवळ बुधवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अरुण कुमार लक्ष्मण (२१), महेबुब मुल्ला (१८), सैफसाब शेख (२०), मुन्ना केंभावे (२१, सर्व राहणार सिंदगी विजापूर) अशी मृतांची नावे आहेत.