पोलीस रस्त्यावर झाडू मारत होता! अभिनेत्यानं पाहिलं अन्...

पोलीस रस्त्यावर झाडू मारत होता! अभिनेत्यानं पाहिलं अन्...

Actor Sachin Gavali News

सोलापूर : अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन गवळी यांनी फेसबुकवर पोलिसांसंदर्भातील पोस्ट शेअर केली आहे. पुणे परिसरात रस्त्यावर झाडू मारताना दिसलेल्या पोलिसाविषयी सचिन गवळी यांनी आपल्या पोस्टमधून कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

पोलीस कर्मचारी रस्त्यावर झाडू का मारत होता? अभिनेते सचिन गवळी यांनी पोलिसांविषयी काय लिहिले आहे? वाचा- 

#Salute
#वर्दितला_पांडुरंग
#माणूसकी जीवंत असणाऱ्या #देवमाणसासोबत एक #झक्कास_सेल्फी.
या व्यक्तीचा आणि माझा काहीही #संबंध नाही.
पण संबंध आला आहे तो फक्त माणूसकीमुळे आणि ते करत असलेल्या कार्यामुळे.
आज काही कामानिमित्त हडपसरला चाललो होतो, Cromeच्या चौकातला सिग्नल क्रॉस करताना लक्षात आले की एक पोलिसवाले दादा रस्त्यावर झाडू मारत आहेत.
पाहिल्यावर खुप अप्रूप वाटले म्हणून पुढे गाडी लावली आणि त्यांना भेटायला वापस चालत आलो.
त्यांना विचारले, दादा तुम्ही आता रस्ता का झाडत होता.???
त्यावर त्यांनी जे उत्तर दिले ते ऐकून त्या देवमाणसाला #Salute करायची इच्छा झाली.
मला बोलले,
सर, पावसामुळे रस्ता उखडला गेलाय, अन या वळनाला सगळीकडे खडी वाळू पसरली आहे,
त्यामुळे गाडी वळवताना कदाचित कोणीतरी वृद्ध, तरुण, मुलगी, किंवा महिला घसरून त्यांचा अपघात होवू नये.
म्हणून शेजारुन झाड़ू मागून घेतलाय आणि रस्ता पूर्ण स्वच्छ/साफ करत होतो.
आणि ते पुढे असेही म्हणाले,
कोणाचा तरी अचानक नकळत अपघात होतो, होत्याचे नव्हते होते आणि मग इतरांना खुप त्रास सहन करावा लागतो...ठरवलेले सर्व बिघडून जाते.
आणि कोणाबाबत चुकुनही असे घडू नये म्हणून मी झाडूने खडी बाजूला सारून पूर्ण रस्ता साफ केला.
लोकांसाठी जे काही चांगले करता येईल ते करतोय,
मी ईमानदारीने सेवा करतोय त्यामुळे मला आयुष्यात काही कमी पडलेले नाही.
मला त्यांचे खुप कौतुक वाटले.
त्यांचे नाव आहे श्री. #विठोबा_पवार, वय वर्षे 55.
मुळ गाव #सातारा जिल्ह्यात आहे.
आजही ते #व्यायाम करतात...
30 वर्षापूर्वी त्यांना 6Packs असलेला आणि 2 बोटाने #सायकल उचललेले फोटो असे बरेच फोटो त्यांनी मला दाखवले...खुप खुश झाले..त्यांचा अद्ध्यात्म ओढ़ा जानवला.
त्यांच्यासोबत मी आवर्जून एक #सेल्फी काढला तर ते मला धन्यवाद बोलले,
मी बोललो, अहो दादा, मला कसले धन्यवाद बोलताय, उलट या रस्त्यावरुन जाणाऱ्या आम्ही सगळ्यांनी तुम्हाला धन्यवाद बोलायला हवेय.
पुन्हा लवकरच भेटूया असे बोलत आम्ही निरोप घेतला.
मित्रांनो, बंधु - भगिनिंनो कधी हडपसर रस्त्यावरून गेलात तर त्यांना भेटून धन्यवाद बोलता आले तर नक्की बोला.
#पुणे_पोलिस #Pune_Police
#PCMCPolice
#महाराष्ट्र_पोलिस #Maharashtra_Police

..#सचिन_गवळी.

#जय_हिंद
#हरहरमहादेव

--

अभिनेते सचिन गवळी यांच्या फेसबुकवरील पोस्टनंतर सकारात्मक परिणाम दिसून आला.‌ पोलीस कर्मचारी विठोबा पवार यांच्या कार्याची वरिष्ठांनी दखल घेतली.

#Salute #वर्दितला_पांडुरंग #माणूसकी जीवंत असणाऱ्या #देवमाणसासोबत एक #झक्कास_सेल्फी. या व्यक्तीचा आणि माझा काहीही #संबंध...

Posted by Sachin Gawali on Sunday, 10 January 2021

ही #सोशल_मीडियाची_ताकद आहे. #ट्राफिक_पोलिस श्री. #विठोबा_पवार यांना #ईमानदारीने करत असलेल्या #मेहनतीचे_फळ 29वर्षानंतर...

Posted by Sachin Gawali on Sunday, 10 January 2021