शेवटच्या दिवशी भावूक झाली शेवंता! काय म्हणाली? वाचा..

शेवटच्या दिवशी भावूक झाली शेवंता! काय म्हणाली? वाचा..

सोलापूर : रात्रीस खेळ चाले.. ही टीव्ही मालिका संपली आहे. या मालिकेच्या दुसऱ्या भागात अभिनेत्री अपूर्वा नेमलेकर म्हणजेच शेवंता हिने चांगलीच लोकप्रियता मिळवली.

या मालिकेचा शेवट झाल्यानंतर अपूर्वा भावनिक झाली. तिने आपल्या फेसबुकवर आपले मनोगत मांडले आहे. 

काय म्हणालीय अपूर्वा? 
वाचा- 
नमस्कार मित्रांनो, 
सर्वप्रथम मी आशा करते की आपण आपली आणि आपल्या जिवलगांची काळजी घेत आहात.. वेळ कठीण जरी असेल तरी आपण पुन्हा जोमाने उभे राहुया.. जसे की आपल्याला ठाऊक असेलच की आपली लाडकी मालिका म्हणजे रात्रीसखेळ चाले 2 ही आज आपला निरोप घेत आहे.. हे लक्षात येताच खूप आठवणी आज पुन्हा दाटून आल्या..

ह्या मालिके चा एक अविभाज्य भाग म्हणून.. मी झी मराठी चे मना पासून आभार मानते.. त्याच बरोबर मी मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते ह्यांचे सुद्धा खूप आभार मानू इच्छिते.. आणि आपण माय बाप प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभल्या बद्दल आपले मनापासून आभार.. मालिका समाप्ती ला आली हे समजायला कठीण तर जात आहेतच पण त्याच बरोबरच खूप साऱ्या आठवणींना पूर्णविराम मिळणार आहे

पहिल्या भागाचे गुपित ह्या भागात उलगडणार आहे म्हटल्यावर शेवंता ह्या भूमिकेचे महत्त्व हे वेगळ्या प्रकारची जबाबदारी स्वीकारून मी पुन्हा टीव्ही वर यायचे ठरवले.. जबाबदारी म्हटली की दडपणाखाली असणे साहजिक होते.. पण त्यातून आपली ओळख पुन्हा निर्माण करायची एक सुवर्ण संधी ह्यातून मला दिसली.. आणि त्याला दिलेला प्रतिसाद त्याची पावती देऊन गेला.. पुढे आपली भूमिका किती महत्वाच्या टप्प्यावर जात आहे हे कळताच माझ्या बरोबर  सगळेच मेहनतीने काम करू लागले.. माझ्या बरोबरच इतर सगळ्यांचा ह्या मालिकेला लाभलेला सहभाग खूप मोठा होता

हा अनुभव खूप मोठी प्रेरणा देऊन गेला आहे आणि अजून काम करायची जिद्द देत राहतो.. कुठलही काम जेव्हा  शेवटच्या टप्प्यात येत तेव्हा आपल्याला त्या बद्दल आपुलकी आणि अभिमान वाटतो.. आज  तसेच काही
वाटत आहे..
शेवंतांचे विविध रंगी पैलू साकारताना तिच्या व्यक्तीरेखा बद्दल फक्त आपण ऐकले होते,पण ही भूमिका रंगवताना त्या मध्ये माझ्या अभिनयाचे रंग चढत च गेले,
 आपल्या मालिकेतून आपलं मनोरंजन पुन्हा एकदा करण्याची संधी दिल्या बद्धल खूप आभार.. पुन्हा नव्याने आपल्या समोर मी लवकरच  येईन ह्या बद्दल मी आशावादी आहे ! आपलं प्रेम आणि प्रतिसाद मिळत रहावा,
 ही विनंती 
एक कलाकार 
म्हणून आयुष्यभर रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करेन ,
बस तुमची साथ कायम राहावी हीच विनंती.. माझा  पॅकअप
 झाल्या नंतर काढलेला हा  आशीर्वाद स्वरूप  फोटो
आणि आज मस्तिष्का वर पडलेले ही पुष्प पाकळी
यांने माझे मन गहिवरून गेले.’


या आहेत प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया -

कित्येक वर्षातून एखादी अशी कलाकृती निर्माण होत असते जी लोकमनावर कायम कोरली जाते. अशा या काही कलाकृतींमध्ये आपली ही मालिका समाविष्ट झाली आहे. खरंच अप्रतिम अशी मालीका होती. संपूच नये असं वाटत असतानाच आपल्या मालिकेने निरोप घेतला. एक हुरहूर लागून राहिली. एवढी सुंदर मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी केल्या बद्दल सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन.
- त्रिमूर्ती राऊत, सोलापूर
--
तू नव्याने पुन्हा एकदा येशील यांची १००% खात्री आहे ..पण अशी #शेवंता पुन्हा होणे नाही.
- नितीन नाईक
--
खुप सुंदर मालिका होती, आणि आपण साकारलेली भूमिका पण छानच होती. शेवंता हे पात्र प्रेक्षकांच्या मनात दीर्घ काळ घर करून राहील. तुमच्या पुढील प्रवासाला खूप शुभेच्छा.
- भारत राऊत
--
अप्रतिम मालिका.यात दाखवलेल्या सगळ्याच गोष्टी अगदी घरच्या सारख्या वाटायच्या.म्हणजे तुमचे कपडे घर घरातल एकंदर रहाणीमान सगळच अगदि ईथेच घडतय अस वाटायच.आणि मुख्य म्हणजे संवाद मला खुप आवडायचे.मी स्वतः कोकणातली आहे त्यामुळे ती भाषा त्याचा लहेजा मला आवडायचा.आम्ही मिस करु.
- मानसी दाते