अभियंता अमेय केत यांनी केला हिमालयीन रुपीन पास सर 

अभियंता अमेय केत यांनी केला हिमालयीन रुपीन पास सर 

Amey Ket Rupin Pass Trek News

खडतर वातावरणात १५१९६ फ़ूट उंच पर्वत माथा सर 

सोलापूर : ‘रुपीन पास’ हा भारतातल्या अत्यंत अवघड अशा पहिल्या दहा ट्रेकमध्ये समाविष्ट आहे. हा आंतरहिमालयीन ट्रेक असून त्याची सुरवात उत्तराखंड या राज्यातून होते व हिमाचल प्रदेशात तो समाप्त होतो.

समुद्र सपाटीपासून सुमारे ३२४६ मीटर  (१५१९६ फ़ूट) उंच पर्वत माथा असलेला रुपीन पासचा ट्रेक हा अत्यंत रम्य; परंतु अवघड ट्रेक असून, त्यामध्ये निसर्गाची विविध रूपं बदलणारं हवामान यांचं दर्शन होतं. रुपीन पासचा ट्रेक हा शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक शक्तीचाही कस पाहणारा असतो.

Video -

कधी साधा पाऊस तर कधी गारांचा , बर्फाळ वारे आणि अधूनमधून उन्हाळ्याची हुलकावणी देणारं ऊन, बर्फाळ कडे अश्या खडतर वातावरणाचा सामना करत महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता अमेय केत आणि त्यांच्या सवंगड्यानी शिखरांवर यशस्वी चढाई केली. 

सदर गिर्यारोहणाची सुरवात उत्तराखंड मधील धौला - सेवा मार्गे हिमाचल मधील झाका-जिसकून-बुरास कांडी-धांदेरास थच- अप्पर वॉटर फॉल ते रुपीन पास सर करून रोंटी गड-सांगला व्हॅली येथे पूर्ण झाला. निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आनंद लुटायला मिळतो आणि त्याच वेळी तो जीव मुठीत धरण्यासही भाग पाडतो! बेस कॅम्पपासून चढाई करण्यासाठी २२ मे ते २९ मे असा सुमारे सात दिवसाचा कालावधी लागला.

छत्रपती शिवाजी महाराज कि जय, भारत माता कि जय म्हणत तिरंगा फडकावत रुपीन पासचा ऑफिशिअल समीट अमेय केत यांनी यशस्वी पूर्ण केला. या गिर्यारोहणाची नोंद इंडियन मॉऊटेनेरिंग फेडेरेशन घेतली आहे. 


शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारं, प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्यास शिकवणारं व मानवाला निसर्गासमोरचं त्याचं क्षुद्रत्व जाणवून देऊन त्याला निसर्गासमोर नतमस्तक होण्यास भाग पाडणारं रुपीन पासचं गिर्यारोहण कायम स्मरणात राहील.
- अमेय केत
उपकार्यकारी अभियंता महापारेषण