सोलापूरच्या प्राणी, पक्षी आणि वृक्षाची झाली घोषणा!

सोलापूरच्या प्राणी, पक्षी आणि वृक्षाची झाली घोषणा!

Animals-birds-and-trees-of-Solapur-announced

सोलापूर : वन विभाग सोलापूर आणि दिव्य मराठी यांच्यावतीने पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत सोलापूरचा पक्षी, सोलापूरचा प्राणी आणि सोलापूरचा वृक्ष निवडण्यात आला आहे.

Video-

शुक्रवारी जुळे सोलापुरातील शिवदारे कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमात अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या उपस्थितीत सोलापूरचा प्राणी, पक्षी आणि वृक्ष यांची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यक्रमास वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक दोडल, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक बी. एस. कुलकर्णी, सोलापूर वन विभागाचे प्रमुख उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, महापालिका उपायुक्त धनराज पांडे, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन, दिव्य मराठीचे पत्रकार विनोद कामतकर उपस्थित होते.

सोलापूरचा पक्षी म्हणून माळढोकची निवड करण्यात आली आहेत. सोलापूरचा वृक्ष म्हणून कडुलिंब निवडण्यात आला आहे. तर सोलापूरचा प्राणी म्हणून काळवीटची निवड करण्यात आली आहे. हजारो सोलापूरकरांनी ऑनलाइन माध्यमातून ही निवड केली आहे. वसुंधरामित्र पुरस्कार प्राप्त दिव्य मराठीचे पत्रकार विनोद कामतकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला.