‘नायकंळ बाई घंळ भारी’ची सोलापुरात धडाकेबाज एन्ट्री

‘नायकंळ बाई घंळ भारी’ची सोलापुरात धडाकेबाज एन्ट्री

सोलापूर : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात बंजारा पारिवारिक मनोरंजक कार्यक्रम नायकंळ बाई घंळ भारी चा चौफेर दौरा सुरू आहे. सदर कार्यक्रमाचे चित्रीकरण  यवतमाळ, जालना उस्मानाबाद (आलियाबाद तांडा) नंतर आज दिनांक २7 ऑक्टोबर रोजी सोलापूर शहरातील श्री सुभाष चव्हाण (स्व. चंद्रराम गुरुजी यांचे चिरंजीव) ह्यांच्या निवास व नगरसेविका अश्विनी चव्हाण नेहरू नगर तांडा  स्थानी हास्यकल्लोळात पार पडले.

बंजारा वर्ल्ड चॅनल निर्मित नायकंळ बाई घंळ भारी, ह्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अनिता राठोड ह्या करत असून त्या स्वतः बंजारा समाजातील नामवंत अभिनेत्री आहेत. ह्या आधी त्यांनी मिसेस ग्लोबल वर्ल्ड प्रिन्सेस साऊथ आफ्रिका व सिंगापूर असून सध्या त्या बंजारा समाजाच्या संस्कृती संवर्धन करण्याच्या दृष्टीने कार्य करीत आहेत.

बंजारा समाजाची संस्कृती नवीन पिढीला माहिती होण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन प्रत्येक तांडव तांडव घरोघरी घेण्याची मोहीम बंजारा वर्ल्ड यांनी घेतली आहे व"नायकंळ बाई घंळ भारी " परिवारातील प्रत्येक आपल्या संस्कृतीची आवड निर्माण व्हावी. व आपल्या पोशाखाची आगळी वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी.. व समाजामध्ये संस्कृतीचे करण्यासाठी कार्यक्रम घेत आहोत..
सोलापूर  ग्रामीण पोलीस अधीक्षक :-तेजस्विनी सातपुते (IPS) यांनाही या कार्यक्रमाची माहिती दिली त्यांनीही या उपक्रमासाठी आम्हाला शुभेच्छा दिले!..

 नायकंळ बाई घंळ भारी
निर्मिती - बंजारा वर्ल्ड चैनल
निर्माता - योगेश जाधव, अनिता राठोड, संदिप जोशी
संकल्पना - अनिता राठोड
निर्देशन - संदिप जोशी
गीत - कांचन जाधव
संगीतकार और गायक - अजय जाधव 
कॅमेरामन - संदीप जाधव व शिवम शिंदे
विडिओ संपादन - चेतन राठोड