लक्ष्मी उद्योग समूहाचे आण्णासाहेब पाटील यांचे निधन

लक्ष्मी उद्योग समूहाचे आण्णासाहेब पाटील यांचे निधन

सोलापूर : लक्ष्मी उद्योग समूहाचे संस्थापक व बीके एंटरप्रायझेसचे संचालक आण्णासाहेब कलगोंडा पाटील यांचे काल शनिवार रोजी रात्री वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 82 वर्षे होते.

दहा - बारा दिवसांपूर्वीच अण्णासाहेब पाटील यांना अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल केले होते. काल शनिवारी रात्री 8.45 वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. कै. कलगोंडा पाटील यांनी उभारलेल्या लक्ष्मी उद्योग समूहाचे आण्णासाहेब पाटील यांनी कै. जयकुमार पाटील यांच्याबरोबर एका वटवृक्षात रूपांतर केले. आज सोलापूर व कोल्हापूर येथे लक्ष्मी उद्योग समूह विस्तारलेला आहे.

आण्णासाहेब पाटील हे रयत शिक्षण संस्था, सोलापूरचे सल्लागार व मार्गदर्शक होते.  त्यांच्या मृत्यूपश्चात मुलगा मनोज, सुन माधुरी, तीन विवाहित मुली, तीन भाऊ, पुतणे,  नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे पार्थिव उद्या सोमवार रोजी सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत त्यांच्या होटगी रोड येथील निवास्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.