गणेशमूर्ती संकलनाची ‘इथेे’ केलीय व्यवस्था; घरीच विसर्जन करणार्‍यांसाठी स्पर्धा

गणेशमूर्ती संकलनाची ‘इथेे’ केलीय व्यवस्था;  घरीच विसर्जन करणार्‍यांसाठी स्पर्धा

सोलापूर : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेने गणेशमूर्ती संकलनासाठी व्यवस्था केली आहे. स्मार्ट सोलापूरकर डिजीटल मीडिया पोर्टल आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या पुढाकारातून यंदाच्या वर्षी घरच्याघरी गणेशमूर्ती विसर्जन करणार्‍या पर्यावरणस्नेही नागरिकांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 


स्मार्ट सोलापूरकर डिजीटल मीडिया पोर्टल आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या पुढकारातून बाप्पांचे घरीच विसर्जन करणार्‍यांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बाप्पांचे घरी विजर्सन केल्यानंतर त्याची छायाचित्रे आणि व्हिडीओ 8888856530 या क्रमांकावर पाठवायची आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. 

सोलापूर महापालिकेकडून संकलीत करण्यात येणार्‍या गणेशमूर्ती तुळजापूर रोडवरील खाणीमधील पाण्यात विसर्जित केल्या जाणार आहेत. जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवशंकर बोंदर यांच्यासह महापालिकेच्या पथकाने या परिसराची पाहणी केली आहे. 

गणेशमूर्ती संकलनासाठी महापालिकेकडून व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेकडून कोणत्या ठिकाणी मूर्ती संकलन करण्यात येणार आहे त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.