जुळे सोलापुरात जाण्यासाठी नवीन पुलाचा पर्याय

जुळे सोलापुरात जाण्यासाठी नवीन पुलाचा पर्याय

खासदार जय सिद्धेश्वर महास्वामींनी केली आसरा पुलाची पाहणी

सोलापूर : जुळे सोलापूर भागाला जोडणारा आसरा रेल्वे ब्रीज अरुंद असल्याकारणाने नेहमीच वाहतुकीची कोंडी होत आहे. या पुलाची रविवारी सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी रेल्वे प्रबंधक शैलेश गुप्ता, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासमवेत पाहणी केली.

संभाजी ब्रिगेड सोलापूर च्या वतीने शहराध्यक्ष श्याम कदम यांनी आसरा रेल्वे पुलाच्या रुंदीकरणासाठी खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले होते. आसरा पुलाच्या रुंदीकरणाची मागणी खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्याकडे केली होती. या निवेदनाची दखल घेऊन खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी प्रत्यक्ष आसरा पुलावर येऊन पाहणी केली व संबंधित अधिकार्‍यांना आसरा रेल्वे पूल रुंदीकरण बाबत किंवा दुसरा नवीन पर्यायी मार्ग होण्याबाबत आदेश दिले. यावेळी  आयुक्त पी शिव शंकर यांनी लवकरच रेल्वे प्रबंधक यांच्याशी बैठक आयोजित करून रेल्वे पूल रुंदीकरण करण्या बाबतचा आराखडा केंद्र शासन व राज्य शासनाला सादर करण्यात येईल असे सांगीतले. 

खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी स्वतः राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा करेन लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन यावेळी दिले. यावेळी दुसरा पर्यायी मार्ग म्हणुन चेतन फौंड्री समोरील गैबीपीर नगर तेथून रेल्वे रुळावरून नवीन पूल तयार करून जामखंडी मंगल कार्यालय मार्गाचा प्रस्ताव समोर आला आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले उपाध्यक्ष सीताराम बाबर  अरविंद शेळके या भागातील नगरसेविका संगीता जाधव,नगरसेवक बाबा मिस्त्री, भीमाशंकर म्हेत्रे, महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे बसवेश्वर माळगे, नगर अभियंता संदीप कारंजे, सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी, कनिष्ठ अभियंता विष्णू कांबळे, सहप्रबंधक गिरीश धामणे उपस्थिती होती.

यावेळी अजित शेटे, सोमनाथ पात्रे, आर्यन कदम, ओंकार कदम, संजय भोसले, विकास सावंत, वैष्णव कोणते, मुस्ताक शेख, रुपेश कीरसावंगी, नितीन देवकते, शुभम कुलकर्णी, धर्मा माने, दत्ता पवार, श्रीकांत सुरवसे, अशितोष माने, महेश तेलुर, महेश बिराजदार, कृष्णा झिपरे, श्रीमंत सुमित गायकवाड इत्यादी उपस्थित होते.

पुलाचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी आज भेट दिली. निधीबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. गैबीपीर दर्गाह रस्ता ते जामगुंडी लॉन याठिकाणी नवीन पुल करता येईल का असेही आम्ही सुचविले आहे. एक रस्ता जाण्यासाठी आणि एक रस्ता येण्यासाठी होऊ शकतो. यावर चर्चा विचार करू असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. 
- श्याम कदम, 
जिल्हाध्यक्ष, संभाजी बिग्रेड