वादग्रस्त बजरंग खरमाटे यांच्या घरावर इडीचा छापा! वाचा कारण..

वादग्रस्त बजरंग खरमाटे यांच्या घरावर इडीचा छापा! वाचा कारण..

नागपूर : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे परब यांच्या संबंधितीत नागपूरमध्ये ईडीने छापा टाकला आहे. वादग्रस्त अधिकारी असलेले बजरंग खरमाटे  यांच्या कार्यालयावर आणि घरावर छापा टाकण्यात आला आहे. खरमाटे हे यापूर्वी सोलापुरात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर कार्यरत होते.

अनिल परब यांच्या प्रकरणाशी संबंधीत नागपूरमध्ये ईडीने छापासत्र सुरू केले आहे. नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या कार्यालयात व घरी ईडीने कारवाई केली आहे. बजरंग खरमाटे हे अनिल परब यांच्या जवळचे अधिकारी समजले जातात. बजरंग खरमाटे हे यापूर्वी सोलापूर येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर होते.

परीवहन मंत्री अनिल परब यांच्या संबंधित कोणत्याही ठिकाणावर ईडीच्या धाडी पडलेल्या नाहीत असे परब यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, अनिल परब यांना रविवारी ईडीने नोटीस बजावली असून मंगळवारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. काही दिवसांपूर्वी सचिन वाझेने त्याच्या जबाबात अनिल परब यांचे नाव घेतले होते. परब यांनी बीएमसी ठेकेदारांची माहिती दिली होती. याच प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

बजरंग खरमाटे यांच्या घरावर आणि कार्यालयावर टाकलेल्या धाडीमध्ये नेमके काय समोर आले आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

बजरंग खरमाटे हे नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिकारी असून ते परिवहन मंत्री अनिल परब यांचे जवळचे मानले जातात. अनिल परब आणि बजरंग खरमाटे यांनी संगनमताने करोडो रुपये जमवले आणि आपसात वाटून घेतले, असा आरोप भाजप नेते किरिट सोमैय्या यांनी केला होता.