पंढरपूर परिसरात बिबट्या! पहा व्हिडिओ-

Bibatya News
पंढरपूर : सोमवारी सायंकाळी गादेगाव जवळील पळशी बोगदा परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली आहे.

मागील‌ काही दिवसापासून उपरी येथील नागरिकांना बिबट्या सदृश्य प्राणी दिसत होता. मात्र आज गादेगावच्या सीमेलगत पळशी बोगद्याच्या जवळ खरोखरच बिबट्या दृष्टीस पडल्याची चर्चा आहे.
आज दि.08/11/2021 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास गादेगावच्या सीमेलगत पळशी बोगद्याच्या जवळ बिबट्या दिसून आल्याचे माऊली नागणे या प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे म्हणणे आहे.

ज्या परिसरात बिबट्या दिसला त्या परिसरात वन अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे. माऊली नागणे यांना दिसलेला प्राणी बिबट्या आहे का नाही हे आत्ताच सांगता येणार नाही. मंगळवारी सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिल्यानंतर प्राण्यांच्या पायांचे ठसे पाहिल्यानंतर सांगता येईल असे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांचे म्हणणे आहे.