Bird Rescue : माळढोक अभयारण्यात सापडला अस्वस्थ वकील!

Bird Rescue : माळढोक अभयारण्यात सापडला अस्वस्थ वकील!

सोलापूर : येथील माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज परिक्षेत्रातील कारंबा हद्दीमध्ये सागर केत यांनी माळढोक सारखा पक्षी जखमी अवस्थेत आढळल्याबाबत सारंग म्हमाणे यांना फोन वरून माहिती दिली. 

घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता अस्वस्थ अवस्थेत आढळून आलेल्या पक्षी माळढोक नसून माळढोक सारखा दिसणारा पांढऱ्या मानेचा करकोचा अर्थात वकील किंवा कांडेसर हा पक्षी असल्याचे निदर्शनास आले. नान्नज पक्षी अभयारण्याचे RFO शुभांगी जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पक्षावर तत्काळ उपचार करण्याच्या हेतूने सोलापूर येथील पशुचिकित्सक डॉक्टर आकांक्षा पोद्दार यांच्याशी संपर्क करून त्यावर उपचार करण्यात आले. अस्वस्थ अवस्थेत आढळून आलेल्या कांडेसर या पक्षाला अन्नातून विषबाधा झाली असण्याची शक्यता ओळखून त्यावर योग्य ते उपचार करण्यात आले. उपचारानंतर तीन दिवस त्या पक्षाची देखभाल राजकुमार कोळी यांनी केली. योग्य त्या आणि योग्य वेळी झालेल्या उपचारामुळे सदरचा पक्षी पूर्णपणे बरा झाला असून त्याला नान्नज अभयारण्य परिक्षेत्रातील त्याच्या नैसर्गिक अधिवासात मध्ये दिनांक 22/9/2021 रोजी मुक्त करण्यात आले. 

सदरची मोहीम माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज च्या वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी जावळे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली वनपाल श्री मुंडे आणि वनपाल श्री दाभाडे, वनरक्षक श्री अशोक फडतरे यांनी ग्रेट इंडियन बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन फ्रंट सोलापूरचे कार्यवाहक राजकुमार कोळी, सदस्य सारंग म्हमाणे, शिवकुमार मोरे, अजय हिरेमठ, मारुती गवळी, बालाजी हुक्के, बंडू गुरव यांच्या सहकार्याने यशस्वी केली.

अडचणीत सापडलेल्या वन्य जीवाला उपचार करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्वसित करणेबाबत केलेल्या सहकार्याबद्दल माळढोक पक्षी अभयारण्य,नान्नज च्या RFO श्रीमती शुभांगी जावळे मॅडम यांनी GIBCF च्या सदस्यांचे आभार मानले आणि यापुढे अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
आपल्या परीसरात कोणताही वन्यजीवा संकटात सापडल्यास 1926 या टोल फ्री क्रमांकावर अथवा GIBCF शी संपर्क करावा, असे आवाहन श्री पंकज प्रकाश चिंदरकर. समन्वयक , GIBCF,सोलापूर. 7083460066, श्री राजकुमार कोळी  कार्यवाहक GIBCF 8482810641 यांनी केले आहे.

मराठी नाव: पांढ-या मानेचा करकोचा - 

इंग्रजी नाव: Woolly-necked Stork.

शास्त्रीय नाव: Ciconia episcopus. लांबी: १०६ सेंमी.

आकार: लांडोरीपेक्षा मोठा.

ओळख: एकंदरीत काळा व ठळक पांढरी मान. डोक्यावर काळी टोपी. बुड व शेपटी खालून पांढरी. चोच लालसर काळी. पाय फिक्कट लाल. उडताना खालून मान व बुड वगळता संपूर्ण काळा. एकटा, जोडीने वा छोट्या थव्याने.

व्याप्ती: रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: झिलानी, ओलिताखालील शेते, नद्या, पाणी साचलेली माळराने. खाद्य: मासे, बेडूक, खेकडे, सरपटणारे प्राणी, मोठे कीटक, गोगलगायी, शिंपल्यातील मृदूशरिरी प्राणी इ.