घरीच होणार बुलेट सर्व्हिसिंग; मोंढे मोटर्सची अभिनव योजना

घरीच होणार बुलेट सर्व्हिसिंग; मोंढे मोटर्सची अभिनव योजना

सोलापूर : सोलापुरात मोंढे मोटर्सच्या सेवेची २५ वर्षे ४ जुलै २०२० रोजी पूर्ण झाली. त्यानिमित्याने मोंढे मोटर्सकडून आपल्या ग्राहकांसाठी घरबसल्या करा बुलेटची सर्व्हिसिंग Royal Enfield 'सर्व्हिस ऑन व्हील्स’ ही योजना राबविली जात आहे.

या योजनेची सुरवात ही दिनांक ५ ऑगस्टपासून केली आहे. कोरोना महामारीमुळे ज्या ग्राहकांना बऱ्याच वेळेस वर्कशॉपमध्ये जाऊन सर्व्हिसिंग करणं शक्य नाही, अशांसाठी मोंढे मोटर्सनी ‘सर्विस ऑन व्हील्स ही नवीन सेवा सुरू केली आहे. यानुसार ग्राहकाच्या घरी जाऊन बाइक सर्व्हिसिंगची सेवा दिली जाणार आहे.  संपर्कात न येता खरेदीला चालना देण्यासाठी ऑनलाइन बाइक बूकिंग सेवाही सुरू केली आहे. ‘सर्व्हिस ऑन व्हील्स’ सेवेनुसार एक मोबाइल सर्व्हिस टीम ग्राहकाच्या घरी जाईल आणि बाइकची पूर्ण सर्व्हिसिंग करेल. या टीमकडे टूल किटसोबत गरज भासल्यास बदलण्यासाठी ओरिजनल स्पेअर पार्ट्सदेखील असतील.  बाइकचे लहान-मोठं रिपेअरिंग, इलेक्ट्रिकल दोष, पार्ट्स बदलणं किंवा दुरूस्ती यांसारखी कामं करेल. साधारणपणे ही टीम 80 टक्क्यांपर्यंत सर्व प्रकारची सर्व्हिसिंग करेल.

या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी मोंढे मोटर्सला वसीम -  8421814048 व कल्पेश -  8237466448 या फोन वर संपर्क करावा लागेल. त्यानंतर सर्व्हिसिंगसाठी वेळ आणि दिवस सांगितल्यानंतर मोबाइल टीम घरी येऊन तुमच्या बाइकची सर्व्हिसिंग करेल, मोंढे मोटर्सचे संचालक विष्णू मोंढे यांनी कळविले आहे.