गणपत आबांच्या भेटीनंतर काय छत्रपती संभाजीराजे? वाचा..

गणपत आबांच्या भेटीनंतर काय छत्रपती संभाजीराजे? वाचा..

सोलापूर : खासदार छत्रपती संभाजीराजे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी माजी आमदार जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांची सांगोला येथे घरी सदिच्छा भेट घेतली. 

शेतकरी कामगार पक्ष हा कार्ल मार्क्स सोबतच राजर्षी शाहू महाराजांचा सुद्धा आदर्श घेऊन वाटचाल करणारा पक्ष आहे असे गणपत आबा यावेळी बोलताना म्हणाले.

या पक्षाच्या माध्यमातून सलग 11 वेळा आमदार होण्याची किमया आबांनी साध्य केली. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळी चालवण्यासाठी त्यांनी बरेच कष्ट घेतले. विधानसभेत सर्वाधिक काळ व्यतीत करत असताना आबांनी जगण्यातला साधेपणा कधीच सोडला नाही. समाजासाठीच आयुष्य खर्ची घालणाऱ्या 94 वर्षीय गणपतराव आबांचा नव्या पिढीतील समाज सेवा करू इच्छिणाऱ्या तरुणांनी अभ्यास जरूर करावा. राजकीय जीवनात आदर्श घ्यावा अश्या व्यक्तिमत्वाची भेट घेऊन त्यांच्याकडून खूप काही शिकलो, अशी भावना छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली.