निवृत्तीच्या एक दिवस आधी अधिकार्‍याने काढलेल्या जीआरमुळे कंत्राटदार अडचणीत!

निवृत्तीच्या एक दिवस आधी अधिकार्‍याने काढलेल्या जीआरमुळे कंत्राटदार अडचणीत!

सोलापूर : महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता तसेच बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या सर्व पदाधिकारी व संचालक व कंत्राटदारांकडून शासन निर्णयाची होळी करून निषेध नोंदविण्यात आला.‌

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सी. पी. जोशी नामक निवृत सचिव यांनी निवृत्त व्हावयाचे एक दिवस अगोदर मुद्दामहुन शासन निर्णय काढला होता. राज्यातील सर्वच कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांना अडचणीत आणण्यासाठी, कंत्राटदारांवर देशद्रोही खटला दाखल करणे ,काम करताना प्रत्येक गोष्टीत जाणीवपूर्वक अधिकारी वर्ग व कंत्राटदार कायम स्वरुपी भांडण लागावीत व वाद व्हावा अशी अनेक हुकुमशाही व दंडलशाही, जुलमशाही असलेल्या अटी, नियम घालून शासन निर्णय ३० जुलै २०२० रोजी काढला आहे. जेणेकरुन येथुन पुढील काळात पुढे जो सचिव पदाचा अधिभार घेणार आहे. तसेच जे कार्यकारी अभियंता व सर्व अधिकारी यांना राज्याचे विकासाचे कामे न करता कंत्राटदार यांच्यावर फौजदारी खटला, गुन्हा दाखल करणे हेच काम करावे  व राज्यातील कंत्राटदार सदर शासन निर्णय रद्दच करावा  यासाठी राज्य भर आंदोलन करावे व सगळेजण अशा करोनाच्या बिकट परीस्थितीमध्ये सगळ्यांनी आपापल्याकडे असलेला कामधंदा, व्यवसाय सोडून हेच करावे, राज्यात सगळीकडे  अस्थिरता निर्माण व्हावी यासाठी तसेच शासन , अधिकारी वर्ग, कंत्राटदार यांच्यामध्ये संभ्रण निमार्ण  व्हावा हा  कुटील डाव, कारस्थान  माजी सचिव यांचा या पाठीमागे होता.

सदर शासन निर्णय तातडीने रद्द करावा , यासाठी आज सोलापुरात सदर शासन निर्णय ची सार्वजनिक होळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता कार्यालयासमोर करण्यात आली. तसेच अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम संतोष शेलार यांना या संदर्भात निषेधार्थ सविस्तर निवेदन महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी दिले सदर‌ आंदोलन अत्यंत मोठ्या पद्धतीने झाले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता यांचे राज्याचे अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले , बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर जिल्हा चेअरमन अमर बिराजदार, व BAI जिल्हा अध्यक्ष व हाॅटमिक्स संघटनेचे संचालक दत्तात्रय मुळे,राज्य सचिव कैलास लांडे,राज्य कंत्राटदार महासंघ चे सोलापूरचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र भोसले, BAI सचिव शशिकांत बेदरकर ,इंजि गोविंद अनागुंडे,शेखर शिवशरण,प्रमोद चव्हाण, प्रमोद कुलाल, हणमंतराव कुलकर्णी,जमीर शेख, बहुसंख्येने कंत्राटदार सदर आंदोलनास करोना परीस्थिती असताना सुद्धा उपस्थित होते.