मास्क, सॅनिटायझर खरेदीमध्ये भ्रष्टाचार! नगरसेवकांचा आरोप...

मास्क, सॅनिटायझर खरेदीमध्ये भ्रष्टाचार! नगरसेवकांचा आरोप...

सोलापूर : क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये शनिवारी सोलापूर महानगरपालिकेचे सन २०२१-२२ या सालचे अंदाजपत्रक संदर्भात पार्टी मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. 

या बैठकीमध्ये आज महिला व बालकल्याण विभाग, मुख्यलेखापरिक्षक, नगरसचिव, युसिडी, दिव्यांग कल्याण, परिवहन उपक्रम, प्राथमिक शिक्षक मंडळ, विभाग कार्यालय क्रमांक १ ते ७ या विभागाची माहिती घेण्यात आली.

कोरोनाच्या काळामध्ये नागरिकांना तर सोडा नगरसेवकांना देखील मास्क, सॅनिटायझर मिळालेला नाही. मास्क, सॅनिटायझर खरेदीमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप बजेट मिटिंगमध्ये नगरसेवकांनी केला. जून महिन्यापासून डेंग्यूचे पेशंट वाढत असताना कोणत्या प्रकारे फवारणी करण्यात येत नाही. यामुळे तात्काळ नियोजन करून प्रत्येक झोन वाईज फवारणी करण्यात यावी. हद्दवाढ भागामध्ये आरोग्य केंद्र, प्रसूतिगृह बांधणे व त्यासाठी लागणारी निधी तरतूद करण्यात यावी आणि मेडिकल डीपीआर म्हणजेच कोणत्या गोष्टी लागणार आहेत त्या तयार करण्यात यावा अश्या सूचना बैठकीमध्ये सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी दिल्या.

या बैठकीस महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते शिवानंद पाटील, ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, माजी उपमहापौर शशिकला बत्तुल, माजी सभागृहनेते श्रीनिवास करली, उपायुक्त एन.के.पाटील, उपायुक्त धनराज पांडे, आरोग्य अधिकारी हाराळकर मॅडम, जेष्ठ नगरसेवक मल्लिकार्जुन कावळे, नगरसेवक नागेश भोगडे, नगरसेवक सुभाष शेजवाल, नगरसेवक श्रीनिवास रिकमलले, नगरसेवक रवी कय्यावले, नगरसेविका मेनका राठोड, नगरसेवक राजकुमार हंचाटे, मुख्यलेखापाल शिरीष दनवे, नगरसेवक विनायक विटकर, नगरसेवक नारायण बनसोडे, परिवहन सभापती जय साळुंखे, स्थापत्य समितीच्या सभापती कल्पना कारभारी, नगरसेविका स्वातीताई आवळे, नगरसेविका वंदनाताई गायकवाड, नगरसेविका वरलक्ष्मी पुरुड, नगरसेविका सुरेखा काकडे, नगरसेविका जुगनूबाई आंबेवाले, नगरसेविका निर्मला तांबे, संगीता जाधव तसेच नगरसेवक, नगरसेविका व संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.