#CyberCrime : सावधान ‘Tata’चा मेसेज शेअर करू नका! नाहीतर..

#CyberCrime : सावधान ‘Tata’चा मेसेज शेअर करू नका! नाहीतर..

सोलापूर : सायबर क्राईम करणाऱ्या मंडळींनी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना फसविण्याचे ठरविले आहे. 

टाटा ग्रुप 150 वा वर्धापनदिन साजरा करत आहे. यानिमित्ताने सहभागी होणाऱ्यांना कार बक्षीस म्हणून दिली जात आहे, अशाप्रकारचा खोटा मेसेज सायबर क्राईम करणाऱ्या मंडळींनी व्हाट्सअपवर व्हायरल केला आहे.

टाटा ग्रुप यांच्या नावाने व्हायरल झालेल्या या मेसेजमध्ये एक लिंक देण्यात आली असून यातून आपली प्राथमिक माहिती घेतली जात आहे. हा सायबर क्राईमचा प्रकार आहे. 

व्हाट्सअपवर आलेला हा मेसेज कोणाला पाठवू नका. हे सायबर क्राईम आहे. आपली माहिती घेऊन बँक खात्यातील पैसे काढून घेतील. गुन्हा दाखल होईल, असे आवाहन स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाच्यावतीने करण्यात येत आहे.