सायकल लव्हर्सच्या सायक्लाॅथानला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रजासत्ताक दिनाचा उपक्रम

सायकल लव्हर्सच्या सायक्लाॅथानला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रजासत्ताक दिनाचा उपक्रम

Cycle lovers activity news

सोलापूर : शारदा प्रतिष्ठान संचलित सायकल लव्हर्स सोलापूर तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापुरात प्रथमच आयोजित केलेल्या व्हर्च्युअल सायक्लाॅथानला स्मार्ट सोलापूरकरांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर ही सायक्लाॅथान व्हर्च्युअल स्वरूपात घेण्यात आली. यामध्ये सहभागी सायकलस्वारांनी आपापल्या परिसरात सायकलिंग केले. या सायक्लाॅथानमधून प्रजासत्ताक दिनानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तंदुरुस्तीचा संदेश देण्यात आला.

सोलापुरमधून प्रथमच आयोजित केलेल्या व्हर्च्युअल सायक्लाॅथान मध्ये ७२व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ७२ किलोमीटर आणि २६ जानेवारी निमित्त २६ किलोमीटर अशा दोन स्वरूपाची होती. 

यामध्ये सोलापूर तसेच पंढरपूर, बार्शी, पुणे, नांदेड, कराड,लातूर, नागपूर, तुळजापूर, उस्मानाबाद, जालना या भागातून उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्यात आला.

आजच्या उपक्रमात सशुल्क २२५ व मोफत १२८ असे एकूण ३५३ सायकलिस्ट सहभागी झाले होते. 

सशुल्क  सायकलपटूना सायकलिंग जर्सी, फिनिशर मेडल, गुडी बॅग आणि सर्टिफिकेट देण्यात आले. इतर सायकलपटूना मोफत ई सर्टिफिकेट देण्यात येईल.

सोलापुरातील विविध मान्यवरांनी या व्हर्च्युअल सायक्लाॅथानमध्ये सहभाग नोंदवला.

ही सायक्लाॅथान यशस्वी करण्यासाठी सायकल लव्हर्सचे महेश बिराजदार, अमेय केत, डॉ. प्रविण ननवरे, अविनाश देवडकर, आदित्य बालगावकर यांनी परिश्रम घेतले.