800 किमी अंतर चार दिवसात पार करून घेतले सप्तश्रुंगी मातेचे दर्शन

800 किमी अंतर चार दिवसात पार करून घेतले सप्तश्रुंगी मातेचे दर्शन

Cyclist Sunil Pawar's 800 km record cycle journey

सोलापूर : सोलापूरतील न्यायालयामध्ये वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असणारे  सायकलपटू श्री सुनिल पवार यांनी नुकतच सोलापूर - नाशिक व परत सोलापूर हे आठशे किमी अंतर पार करीत नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठापैकी एक गणलेल्या सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले.

शिवरायांच्या आदर्श विचाराने प्रेरित झालेले श्री सुनिल पवार मूळचे मोहोळचे. स्वतःची नोकरी संभाळून आरोग्यासाठी दररोज सायकलिंग करतात. यापूर्वी त्यांनी तुळजापूर, अक्कलकोट, कुडल संगम, पंढरपूर , उजनी धरण अशा बऱ्याच तीर्थक्षेत्र व निसर्गरम्य ठिकाणी सायकल वर प्रवास केला आहे.

सप्तश्रुंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी दिनांक 10 ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजता ते सायकलवर नाशिक कडे रवाना झाले. पुणे पार केल्यानंतर उलटे वारे, वादळ, पाऊस सुरू झाले. या नैसर्गिक आसमानी संकटांना तोंड देत त्यांनी हा आठशे किलोमीटरचा सायकल प्रवास एकट्याने पार केला.

त्यांच्या या कामगिरीबद्दल सोलापुरातील सायकल लव्हर्स क्लब कडून त्यांना सन्मान पत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. 

यावेळी सायकल लव्हर्स ग्रुपचे महेश बिराजदार, डॉ. प्रविण ननावरे, अमेय केत, आदित्य बालगावकर हे उपस्थित होते.

 यावेळी डॉ. अभिजित वाघचवरे यांनी लॉंग डिस्टन्स सायकलिंग करते वेळी घ्यावयाची काळजी , आहार आणि पाण्याचे महत्व, आपत्कालीन स्थितीचा सामना कसा करावा याबद्दल  उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

श्री सुनिल पवार यांनी सत्काराला उत्तर देताना त्यांना प्रवासात आलेले अनुभव कथन केले. 

शिवरायांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि माता सप्तशृंगी देवीवरील श्रद्धेमुळे मी सोलापूर ते नाशिक हा सायकल प्रवास करण्याचा निश्चय केला. पुणे पार केल्यानंतर हवामान बदलले. त्यामुळे उलट वारे पाऊस यांचा सामना करावा लागला. परंतु प्रवासादरम्यान खूप देव माणसे भेटली ज्यांच्या सहकार्यामुळे ही राईड पूर्ण झाली. सायकल लवर्स क्लब तसेच मित्र नातेवाईक व कुटुंबीय दिलेले प्रोत्साहन व शुभेच्छा या वेळी कामी आल्या. 

- सुनिल पवार,
सायकल प्रेमी, सोलापूर