ऑक्सिजन पुरवठ्याचा दररोज घेणार आढावा

ऑक्सिजन पुरवठ्याचा दररोज घेणार आढावा

सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर : जिल्ह्यातील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीतपणे सुरु राहावा यासाठी, समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या. 

जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी आज जिल्हास्तरीय ऑक्सिजन पुरवठा संनियंत्रण समितीची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, अर्चना पाटील, महाव्यवस्थापक बीटी यशवंते, औषध प्रशासनाचे राहुल भालेराव, जिल्हा शल्यचिकित्सक मोहन शेगर, सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटलमध्ये लागणारा ऑक्सिजनचा दररोज आढावा घेऊन त्यानुसार मागणी कळवली जावी. ही मागणी पुणे विभागीयस्तरावर विकसित करण्यात आलेल्या वेबसाईटवर नोंदणी करावी, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.बैठकीस आर्निकेम इंडस्ट्रीजचे  राहुल आराध्ये, अलीम शेख, अन्न औषध पुरवठा विभागाचे निरीक्षक एन. एस. भालेराव आदी उपस्थित होते.

दरम्यान, जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा, यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी.टी. यशवंते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, अर्चना गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले सदस्य आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त राऊत सदस्य सचिव आहेत