पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे सोलापुरात दाखल

पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे सोलापुरात दाखल

पोलिस मुख्यालय, वाहतूक शाखेची असेल जबाबदारी

सोलापूर : औरंगाबाद येथील नागरी हक्क संरक्षणविभागाच्या पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांची सोलापूर पोलिस आयुक्तालयात उपायुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. उपायुक्त डॉ. धाटे-घाडगे या रविवारी पोलिस आयुक्तालयात दाखल झाल्या असून सोमवारपासून पोलिस मुख्यालय आणि वाहतूक शाखेच्या प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. 

पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे या मूळच्या बीड जिल्ह्यातील आहेत. 2007 साली त्या महाराष्ट्र पोलिस सेवेत दाखल झाल्या. पोलिस उपअधीक्षक म्हणून औरंगाबाद येथून सेवेला सुरवात झाली. त्यानंतर लातूर, पुणे, उस्मानाबाद, औरंगाबाद येथे सेवा बजावली आहे. सोलापूरला बदली होऊन येण्यापूर्वी त्या औरंगाबादमध्ये नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. 

पोलिस उपायुक्त डॉ.  दीपाली धाटे-घाडगे म्हणाल्या, सोलापूरविषयी बरंच चांगलं ऐकलं आहे. सोलापुरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी माझा प्रयत्न असेल. तसेच महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काम करणार असल्याचेही त्यांनी स्मार्ट सोलापूरकर पोर्टलशी बोलताना सांगितले. 

उपायुक्त बापू बांगर झाले रिलॅक्स..
पोलिस मुख्यालय आणि वाहतूक शाखेच्या प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणार्‍या वैशाली कडूकर यांच्याकडे आता परिमंडळ विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. मधूकर गायकवाड यांच्यानंतर गेल्या एक वर्षापासून परिमंडळ विभागाचा अतिरीक्त कार्यभार गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांच्याकडे होता. परिमंडळ विभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळाल्याने बापू बांगर रिलॅक्स झाले आहेत.