अरे व्वा भारीच! 11 वर्षाच्या धैर्यची 111 किलोमीटर सायकलिंग

अरे व्वा भारीच! 11 वर्षाच्या धैर्यची 111 किलोमीटर सायकलिंग

Dhairy Gore 111 Kilometers Cycling 

सोलापूर :
वाढदिवसाच्या निमित्ताने काहीतरी वेगळं करावं असं प्रत्येकाला वाटंत.. असंच काहीसं जुळे सोलापुरात राहणार्‍या अकरा वर्षीय धैर्य गोरे याने केले आहे. त्याने वाढदिवसाच्या निमित्ताने 111 किलोमीटर सायकलिंग केली. धैर्य हा सोलापूर सायकल लव्हर्स ग्रुपचा सदस्य आहे.

वाढदिवसाला संकल्प सोडत नवरात्रनिमित्त साोलापूर ते तुळजापूर आणि तुळजापूर ते सोलापूर असा सायकल प्रवास केला. सायकलिंगची आवड असलेले नूतन पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी धैर्यचा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी सायकल लव्हर्सचे अमेय केत, डॉ. प्रवीण ननवरे, महेश बिराजदार, अदित्य बालगावकर, मानसी गोरे आदी उपस्थित होते. यावेळी सायकल लव्हर्सच्यावतीने नुतन आयुक्त बैजल यांचे स्वागत करण्यात आले.

धैर्य याने 10 ऑक्टोबर रोजी सायकलचा प्रवास पूर्ण केला. पहाटे 4.30 वाजता त्याने घरापासून प्रवास सुरू केला आणि तुळजापूरला सकाळी 8.30 वाजता पोहोचला. तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन तो लगेच सकाळी 9.30 वाजता परतीच्या प्रवासाला निघाला. दुपारी 1 वाजता तो घरी पोहोचला. या प्रवासाकरिता साायकल लवर्स ग्रुप आणि महेश बिराजदार याचे मार्गदर्शन लाभले. या प्रवासात अनेक प्रौढ व्यक्ती त्याच्यासोबत सायकलिंग करीत प्रवास केले. धैर्य हा इंडीयन मॉडेल स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याला ट्रेकिंगचीही आवड आहे.