उपायुक्त धनराज पांडे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

उपायुक्त धनराज पांडे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

Dhanaraj Pande Corona Positive News

सोलापूर : महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे हे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहेत.

गेल्या वर्षी 2020 मध्ये जून महिन्यात उपायुक्त धनराज पांडे आणि त्यांचे कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह होते. कोरोनामधून उपचार घेऊन बरे झाल्यानंतर उपायुक्त धनराज पांडे यांनी सोलापुरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उत्साहाने काम केले होते. 

गेल्या दोन दिवसांपूर्वी घशामध्ये खवखवण्याचा त्रास झाला. तसेच डोकेही दुखत होते. दोन डोस झाले असतानाही तिसऱ्या लाटेमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्याचे उपायुक्त पांडे यांनी सांगितले.

डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतल्यानंतर आता प्रकृती बरी होत असल्याचे उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगितले. तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन नागरिकांनी करावे. घराबाहेर पडताना मास्क घालावा, गर्दीमध्ये जाणे टाळावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.