डिसले गुरुजींनी केली कोरोनावर मात

डिसले गुरुजींनी केली कोरोनावर मात

सोलापूर : ग्लोबल टीचर प्राईस मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी जिल्हा परिषद शिक्षक रणजीतसिंह डीसले यांचा सत्कार केला‌. या आनंदात असतानाच डिसले यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचार घेऊन डीसले बरे झाले आहेत. 

उपचार घेऊन बरे झाल्यानंतर डिसले यांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. रणजितसिंह डिसले म्हणतात.. 

‘ग्लोबल टीचर प्राईझ मिळाल्याचा आनंद साजरा करीत असतानाच  कोरोनाग्रस्त झालो. मात्र योग्य वेळी निदान झाल्याने उपचार लवकर सुरू झाले आणि परिस्थिती लवकरच आटोक्यात आली . 
बार्शीचे सुप्रसिद्ध डॉक्टर संजय अंधारे सर आणि सुश्रुत हॉस्पिटलचे सर्व देवदूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेऊन कोरोनावर मात केली, याचा आनंद आहे‌

मागील 10 दिवस अंधारे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी केलेले परिश्रम यामुळे आज मी कोरोनामुक्त झालो आहे, याचा आनंद आहे.
अर्थात लढाई अजून संपलेली नाहीये.   आपण सर्वांनी दिलेल्या सदिच्छा, प्रेम आणि डॉक्टर संजय अंधारे सरांनी केलेले उपचार यामुळे अर्धी लढाई जिंकली आहे . 

सुश्रुत हॉस्पिटलच्या सर्वच देवदूतांचे मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो. आणि सर्वांना एकच आवाहन करतो, की लक्षणे दिसू लागताच डॉक्टरांशी संपर्क साधा, लगेच टेस्ट करून घ्या. लवकर निदान आणि वेळेवर उपचार हीच कोरोनावर मात करण्याची युक्ती आहे.’