#प्रेरणादायी : दिव्यांग सोमनाथने केला ‘अंकाई-टंकाई’वर ट्रेक!

#प्रेरणादायी : दिव्यांग सोमनाथने केला ‘अंकाई-टंकाई’वर ट्रेक!

वसुंधरा महाविद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी सोमनाथ धुळे याची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी
राज्यातील 20 दिव्यांग विद्यार्थ्यांसह अंकाई टंकाई किल्ल्यावर दुर्ग भ्रमंण संवर्धन मोहिम यशस्वी

सोलापूर : येथील वसुंधरा कला महाविद्यालयातील सोमनाथ धुळे या विद्यार्थ्याने राज्यातील 20 दिव्यांगासह अंकाई टंकाई जोड किल्ला सर केला.

हीशिवप्रेमी, दुर्ग प्रेमी व इतिहास प्रेमी सर्व प्रकारच्या राज्यातील 20 दिव्यांगांनी मनमाड जवळील बेलाग बुलंद आणि खणखणीत अशा अंकाईटंकाई किल्ल्यावर दि. 10 ऑक्टोबर रोजी काळ्याकुट्ट अंधारात यशस्वी चढाई केली.

या मोहिमेत पुर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातुन दिव्यांग या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. अतितीव्र दिव्यांगत्व असलेल्या सोलापूरचे सोमनाथ धुळे या दिव्यांग तरुणाने सहभाग घेतला.  सोमनाथ धुळे हा 85% अपंग असताना सुद्धा केवळ इच्छा शक्ती जोरावर त्याने अत्यंत अवघड असलेला किल्ला रात्री अंधारात यशस्वीरीत्या पूर्ण करुन केला.

रात्रीचा मुक्काम गडावरील गुहेत करुन मोहीम पूर्ण केली. अंकाई टंकाई किल्ला नाशिक जिल्ह्यात असुन ते किल्ल्याची उंची सुमारे 966 मीटर उंच आहे आणि फुटामधे 3170 फुट उंच आहे. यावेळी त्यांने भविष्यात एकदम खडतर आणि उंच असलेल्या शिखर सर करण्याची मोहीम वसुंधरा महाविद्यालय आणि शिव उर्जा प्रतिष्ठान या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

या अगोदर सोमनाथ धुळे यांने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई दोन वेळा सर केले आहे. तसेच दिव्यांगासाठीची राष्ट्रीय स्तरावरील व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेतेपद सुद्धा पटकावले आहे. त्यानंतर आता एक हजार मीटर उंचीचा अंकाई-टंकाई  हा जोड किल्ला सर केला आहे. याबरोबरच अभ्यासात सुद्धा त्याने चमकदार कामगिरी केलेली आहे. तो सध्या वसुंधरा महाविद्यालयातील बीसीए भाग-3 या वर्गात शिकत आहे. या त्याच्या कामगिरीबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मीना गायकवाड, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून सत्कार केला.

माझे स्वप्न खूप मोठे आहे. मला या देशासाठी खूप काही करायचं आहे. मला लहानपणी सैनिक होण्याचे स्वप्न होते पण शाळेला जाताना ट्रॅक्टर अपघातांमध्ये मी कायमस्वरूपी अपंग झालो. स्वप्न होतं देशासाठी लढा देशसेवा करायचे. ते स्वप्न अधुरे राहिले तरीही मी जिद्द हरलो नाही. वेगवेगळ्या क्षेत्रातून मला जमेलच्या क्षेत्रातून माझा भारत देशाला जागतिक पातळीवर घेऊन जाणार आहे.

- सोमनाथ धुळे, गिर्यारोहक