आनंदाची बातमी; डॉ. मीरा शेंडगे यांची रंगभूमी परिनिरीक्षण मंडळावर निवड

आनंदाची बातमी; डॉ. मीरा शेंडगे यांची रंगभूमी परिनिरीक्षण मंडळावर निवड

सोलापूर : सोलापूरच्या ज्येष्ठ नाट्यलेखिका, दिग्दर्शिका व नाट्यकलावंत डॉ. मीरा राजेंद्र शेंडगे यांची महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळावर निवड करण्यात आली आहे.

डॉ. मीरा शेंडगे या गेल्या तीस वर्षापासून मराठी रंगभूमीवर कार्यरत आहेत. त्यांनी बालरंगभूमीसाठी अनेक वर्षे काम केले आहे. त्यांनी 35 हून अधिक संहितांचे लिखाण केले असून, तेलेजू या बालनाट्याला त्यांना प्राथमिक राज्य बालनाट्य स्पर्धेत प्रथम आणि अंतिम फेरीच्या बालनाट्य स्पर्धेत पहिले पारितोषिक प्राप्त झालेले आहे. राज्य नाट्य स्पर्धेत सावल्या या नाटकातील प्रमुख भूमिकेसाठी त्यांना शासनाचे रौप्यपदक मिळाले आहे.
स्मार्ट सोलापूरकर परिवाराच्यावतीने डॉ. मीरा शेंडगे यांचे अभिनंदन..