डॉ. प्रीती टीपरे आता क्राईम एसीपी!

डॉ. प्रीती टीपरे आता क्राईम एसीपी!

Dr. Preeti Tipare is now a crime ACP

सोलापूर : पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्तांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत. पोलिस आयुक्त हरिश बैजल यांनी नव्या आणि जुन्या सहाय्यक आयुक्तांना न्याय दिला आहे.

विभाग दोनच्या सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांना गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात दुसऱ्यांदा एका महिला पोलीस अधिकाऱ्याकडे गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या कालावधीत शर्मिष्ठा घारगे- वालावलकर यांच्याकडे गुन्हे शाखा सहाय्यक आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली होती. 

सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. टिपरे यांनी गेल्या महिन्यात विजापूर रोड परिसरातील ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकून मोठी कारवाई केली होती.

सहायक पोलिस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांना उत्कृष्ट तपासाकरिता केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले आहे. सोलापुरातील बाललैंगिक अत्याचार प्रकरणाच्या उत्कृष्ट तपासाची दखल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून घेण्यात आली आहे.

याप्रमाणे झाल्या बदल्या :
- डॉ. प्रीती टिपरे (विभाग दोन येथून गुन्हे शाखा)

- दीपक आर्वे (विशेष शाखा येथून शहर वाहतूक शाखा)

- डॉ. संतोष गायकवाड (अक्कलकोट येथून नव्याने हजर ते विभाग १)

- माधव रेड्डी (विभाग १ येथून विभाग २) 

- प्रांजली सोनवणे (प्रशासन)

- अनिल लंभाते (शहर वाहतूक शाखा ते विशेष शाखा)

- अजय परमार (नियत्रंण कक्ष)