कोकण भटकंतीने वाढविला उत्साह; इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम

कोकण भटकंतीने वाढविला उत्साह; इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम

Eco Friendly Club Kokan Tour News

सोलापूर : निसर्ग पर्यटन वाढावे यासाठी कार्यरत असलेल्या इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून सोलापूर, उस्मानाबाद आणि पुणे येथील निसर्गप्रेमींनी कोकण भटकंती केली. रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा किल्ला, काशिद बीच आणि कोरलाई किल्ला परिसरात भटकंतीचे आयोजन करण्यात आले होते.

25 नोव्हेंबर रोजी सर्वजण होम मैदान येथून मार्गस्थ झाले. 26 नोव्हेंबर रोजी सर्वजण चिकणी गावातील स्वप्नाली टुरिस्ट होम येथे पोचले. फ्रेश झाल्यानंतर सर्वांनी चहा-नाश्ता केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय.. भारत माता की जय.. च्या घोषणा देत मुरुड येथील जंजिरा किल्ला परिसरात पोचले. बोटींग करत सर्वजण जंजिरा किल्ल्यावर पोचले. बोटींग क्लबचे सचिव शहनवाज भाई आणि त्यांचे सहकारी इमरान भाई यांनी जंजिरा किल्ल्याविषयी माहिती सांगितली. जंजिरा किल्ल्यावरुन दिसणारा पद्मदुर्गही सर्वांनी पाहिला.


जंजिरा किल्ल्याच्या भटकंतीनंतर सर्वजण सुरक्षितपणे बोटींग करत पुन्हा एकदा मुरुड परिसरातील राजपुरी गावातील जेट्टीवर पोचले. मुरुड येथील पाटील खानावळ येथे दुपारचे जेवण केले. सायंकाळी चिकणी येथील स्वप्नाली टुरिस्ट होम येथे पोचून सर्वजण फ्रेश झाले. त्यानंतर सायंकाळी स्थानिक बीचवर फेरफटका मारला.

रात्री कोकण भटकंतीमध्ये सहभागी इको फ्रेंडली क्लबचे सदस्य संतोषकुमार तडवळ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी तडवळ यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमानंतर महादेवी कोळी, सरस्वती कोकणे यांनी गाणी सादर केली.

दुसर्‍या दिवशी म्हणजे 27 नोव्हेंबर रोजी सकाळी लवकर उठून सर्वजण पुन्हा एकदा समुद्र किनार्‍यावरील भटकंतीसाठी रवाना झाले. यावेळी अनेकांनी वॉटर स्पोर्टचा आनंद घेतला. अनेकांनी आयुष्यात पहिल्यांदाच समुद्राच्या पाण्यात खेळून आनंद व्यक्त केला. फ्रेश आणि चहा-नाश्ता झाल्यानंतर सर्वजण काशीद बीचवर पोचले. उत्साही वातावरणात काही सदस्यांनी कुटूंबीयांसोबत पॅरासेलिंग केले. दुपारच्या जेवणानंतर सर्वजण कोरलाई किल्ला परिसरात पोचले. समुद्र किनार्‍यावरुन सुर्यास्त पाहून सारेच आनंदून गेले. 

रोहा परिसरातील सुरुची हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण केल्यानंतर सर्वजण पुणे, सोलापूर आणि उस्मानाबादच्या दिशेने रवाना झाले. या कोकण भटकंतीसाठी इको फ्रेंडली क्लबचे मार्गदर्शक, रायगडचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे, समन्वयक सटवाजी ऊर्फ अजित कोकणे, जेष्ठ सदस्य माधव वडजे, संतोषकुमार तडवळ, विवेक वाले, रेल्वे अधिकारी संतोष घुगे, हॅपी टू हेल्प फाउंडेशनचे संस्थापक मदन पोलके यांच्या नेतृत्वाखालील या कोकण भटकंतीमध्ये महानंद वडजे, सुधीर गावडे, पुनम गावडे, अनुराधा जेवळीकर, सीमा डोके, वैशाली डोंबाळे, अनिता खडतरे, डॉ. राजश्री मठ, डॉ. प्रज्ञा मिस्त्री, कार्तिकेय मठ, मंजुषा कलशेट्टी, ओंकार कलशेट्टी, गायत्री कलशेट्टी, मनीषा इंदापुरकर, भाग्यश्री गायकवाड, पोर्णिमा पोलके, सायली पोलके, संकेत पोलके, भीमा स्वामी, सीना स्वामी, नजमुन्निसा मुजावर, श्रीशैला सोनकांबळे, विद्या गायकवाड, वैशाली सरतापे, सत्यम सरतापे, आनंद कोळी, महादेवी कोळी, विवेक कोळी, माधुरी कोळी, श्रीनिवास गोसकी, आरती गोसकी, सोनाली काशिद, शिल्पा तडवळ, आर्थव तडवळ, आरव जाधव, प्रसाद गायकवाड, गंगुबाई कोकणे, सरस्वती कोकणे, आराध्या कोकणे आदी सहभागी झाले होते.

कोकण भटकंतीमध्ये सहभागी झालेल्या सदस्यांच्या प्रतिक्रीया-

इको फ्रेंडली ग्रूपने आयोजित केलेल्या ट्रीपला आम्ही अगदी उत्साहाने निघालो. सुरुवातीला सगळे जण अनोळखी होतो.पण दुसऱ्यादिवशी मात्र अगदी एका कुटुंबातील असल्यासारखे वाटत होते. होडीने आम्ही जंजिरा किल्ला पाहिला ,किल्ल्यावरून त्या सागराचे नयनरम्य दृश्य  पाहिले. त्या नंतर सर्वांनी जेवण केलं .दोन दिवसांचे ते सात्विक जेवण म्हणजेच,सर्वांना प्रवासात पचण्यास हलके असे होते. पाण्याची देखील सोय छान होती. आम्ही सगळे जण दोन दिवस बिच वर मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटला. वयाचे भान विसरून सगळे जण खेळत होते.या ट्रिप मध्ये  कोकणे सरांची पूर्ण फॅमिली आम्हा सर्वांची काळजी घेताना दिसत होती. अगदी जेवणापासून ते फोटोग्राफी पर्यंत काळजी घेत होते. चिमुकलीआराध्या पण कुठे कमी पडली नाही. तिचा स्माईल प्रवासाचा शीण घालवत होता.तसेच सर्वजण एकत्र येऊन समुद्रकिनारी गाण्याच्या भेंड्या चा देखील आनंद लुटला.अथांग सागरात  सूर्याचा अस्त होतानाचा विलोभनीय दृश्य आम्ही पहिल्यांदाच अनुभवला आहे.आणि अविस्मरणीय क्षण मनात साठवून ठेवला आहे. अडचणीच्या प्रसंगी कोकने सराची टिम कशी सहकार्य करते. ते आम्ही अनुभवले आहे. त्यामुळे इको फ्रेंडली ग्रूपसोबत आम्ही सगळे नेहमीच प्रवास करायला आतुर आहोत. सोबतचे डॉ. संतोष, वाले सर, पोलके सर. गावडे सर. वडजे सर, घुगे सर, अजित कोकणे सर्वजण सर्वाची काळजी घेत होते. यापूर्वीही आम्ही प्रवास केला आहे.पण "माझ्या महाराष्ट्राचा इतिहास आणि निसर्ग पर्यटन" याची ओढ आम्हाला इको फ्रेंडली ग्रूप मुळे समजली आहे.,"निःस्वार्थ सेवा. आनंदाचा मेळा, सहकार्याची भावना."म्हणजेच इको फ्रेंडली कोकणे ग्रुप आहे* असे मला वाटते.या ग्रुप साठी खूप खूप शुभेच्छा. इको फ्रेंडली ग्रूप खूप मोठा होवो. हि आमच्या फॅमिलीकडून ईश्वर चरणी प्रार्थना.
- महादेवी आनंद कोळी

कोकण ग्रूपवर जे सगळ्यांनीच फोटो व व्हिडीओ शेअर केलेत ते पाहून एक मात्र सगळ्यानाच जाणवल आसेल की इको फ्रेंडली ग्रूप तर आहेच परंतु या ग्रुपमध्ये एका कुटुंबाप्रमाणे लहानांपासून ते जेष्ठापर्यतं प्रत्येकाविषयी प्रत्येकांलाच आपुलकी असल्याचेच दिसून आले असेलच माझ्या घरच्यांनी तरी आस म्हणाले की एवढी चांगली व्यवस्था व आपुलकी आहे हे मी प्रथमच अनुभवल आहे त्याच प्रमाणे   मलाही आपल्या ग्रपचे कोकणे सर व त्यांचे कुटुंबीय व आपले सर्वानाच सहकार्य करणारे व प्रत्येकाला खदखदून हसवणारे. डॉक्टरसाहेब तसेच कविताकार मदन पोलके सर, इको फ्रेंडली ग्रूप बरोबर पहिल्यांदाच आलेले गावडे साहेब यांनी देखील सर्वानांच सहकार्य केलेआणि नेहमीच आपल्या सोबत आसलेले घुगे साहेब आसे सर्वानीच आगदी मनसोक्त आनंद बीचवर व जंजिरा किल्ला अनुभवला यांचे सर्व श्रेय कोकणे सर व त्यांचे सहकारी याच्यां उत्तम नियोजनमुळेच शक्य झाले. इको फ्रडंली ग्रूपचे आभार मानावे तितके कमीच आहेत.
- माधव वडजे

इको फ्रेंडली क्लब च्या भटकंती विषयी खूप एकण्यात होते. शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची भटकंती ची आधीपासूनच खुप उत्सुकता मनाला असायची पण काही सांसारिक जबाबदाऱ्या यातून कधी सुटका होत नसायची पण यातूनही वेळ काढून आपले हे स्वप्न पूर्ण करायचे जेव्हा मी ठरवले तेव्हा प्रथमत: निसर्ग माझा सखा आयोजित रायगड किल्ल्याची अतिशय उत्तम भटकंती घडली. त्यातूनच उत्सुकता अधिक वाढत गेली व हरिश्चंद्र भटकंती पार पाडली. इको फ्रेंडली क्लब च्या भटकंती संदर्भात बरंच काही सकारात्मक ऐकून होते. 25 नोव्हेंबर 2021 रोजी  रात्री ठीक नऊ वाजता होम मैदानावरून जंजिऱ्याकडे प्रस्थान करण्यात आले. सुमारे  आठ वाजता सकाळी आमची टीम जंजिऱ्याजवळ असलेल्या राजपुर या गावी पोहोचली. सर्वजण फ्रेश होऊन चहा नाष्टा करून किल्ले जंजिरा कडे निघालो. किल्ल्याकडे जाताना लांबूनच दिसत असलेला जंजिरा लक्ष वेधून घेत होता. कोकण किनाऱ्याची शोभा वाढवणारा हा ऐतिहासिक किल्ला. या किल्ल्याला भेट देणारा तो अविस्मरणीय क्षण होता. निसर्गरम्य ,नयनरम्य किल्ल्याचे ते दिसणारे रूप पाहून सार्‍या प्रवासाचा शीण क्षणात उतरून गेला. मालवणच्या किनाऱ्या वरून त्या दूरवरच्या किल्ल्याकडे पाहिलं कि , किल्ल्याकडे पाहतंच रहावं आणि तिथंच रमावं असं वाटत होतं. किनाऱ्यावरून किल्ल्यावर जायला चांगली सोय होती. आमची टीम होडीतून किल्ल्याकडे जाण्यास निघाली. अथांग समुद्रात हेलकावे खात आमची होडी जात होती. जसजसा किल्ल्याच्या जवळ जातोय तशी तशी मनात एक वेगळीच उत्सुकता दाटली होती. नावेचे नावाडी जातीने मुस्लिम होते अतिशय बारकाईने किल्ल्याचा इतिहास सांगत होते.शिवरायांचा व भारत देशाचा त्यांच्या मनात खूप अभिमान होता. त्यांचे हे देशप्रेम पाहून मन भरून आले. आमची होडी किल्ल्याच्या जवळ पोहोचली होती. होडीतून उतरून समोर पाहिलं ते जंजिरा किल्ल्याचं अवाढव्य रूप नजरेत मावत नव्हतं. आत शिरताच सर्वांनी 'शिवाजी महाराज की जय'' जय भवानी जय शिवाजी' 'भारत माता की जय'... अशा घोषणा देत होतो. जणू काही तो किल्लाच जिंकला आहे. आम्ही किल्ल्याच्या तटावरून गोल फेरफटका मारला सभोवार नीळा समुद्र आणि किल्ल्याच्या तटांवर आदळून फेसाळणाऱ्या     लाटा मनाला प्रसन्न करत होत्या. जंजिरा हा शब्द अरबी भाषेतील जझीरा या शब्दापासून तयार झाला.जझीरा म्हणजे बेट. मुख्य प्रवेशद्वार आवर्ती तीन भव्य तोफा  आहेत त्या म्हणजे कलालबांगडी चावरी व लांडा कासीम अशी आहेत. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती .राजाश्रय संपल्यावर त्या सर्व वस्त्या तेथून उठून गेल्या  व पुढे चालून ते लोक जेथे वास्तव्यास आले ते सध्याचे ठिकाण म्हणजे राजपूर होय. जंजिऱ्या च्या पलीकडे असलेल्या बेटावर संभाजी महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. विशेष म्हणजे चहूबाजूने खाऱ्या पाण्याचा समुद्र पसरलेला असूनही आत दोन गोड्या पाण्याचे तलाव होते. जंजिरा किल्ल्याचे बांधकाम जवळजवळ 22 वर्षे चालू होते हे बांधकाम बावीस एकरवर पसरलेले आहे त्यात 22 सुरक्षा चौक्या आहेत. भिंतींच्या आवरणाखाली जंजिरा किल्ल्याचा दरवाजा बांधला गेला आहे. त्यामुळे गडाच्या अगदी जवळ आल्यावर ही प्रवेशद्वार कोठून आहे हे समजत नाही. अनेकांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण कोणीही यशस्वी होऊ शकले नाही... साधारण तीन तास  किल्ला भटकंती केल्यावर आम्ही दुपारचे जेवण आटोपले  व संध्याकाळी काशिद बीच किनाऱ्यावर गेलो...

रात्री विश्रांती घेऊन पहाटे साधारण सहा वाजता आम्ही परत बीच वर गेलो कारण आदल्या दिवशी जास्त वेळ देऊ शकलो नव्हतो दोन टेकड्या मध्ये असणारा आणि साधारणपणे तीन किलोमीटर पसरलेला समुद्रकिनारा येणाऱ्या पर्यटकांना सुखाची पर्वणी होता... कोंकणातील सर्वात लांबीचे बीच मध्ये याची गणना केली जाते. सकाळी सहा पासून ते दहा पर्यंत मनमुराद सागरी लाटांचा अनुभव घेत असताना सर्व गोष्टींचा विसर पडून गेला. निळाशार समुद्र किनारा ,चमचमणारी पांढरी वाळू आणि आजूबाजूला असणारा रम्य निसर्ग स्वर्ग सुखाची चाहूल देऊन जातो. पाण्यातील विविध राईड्स चा अनुभव घेऊन मनमुराद फोटोसेशन करून परतीचा प्रवासाकडे निघायचे होते. कारण संध्याकाळचा सुर्यास्त आम्हाला कोरलाई किल्ल्यावर बघायचा होता. दुपारचे जेवण करून साधारण चारच्या सुमारास कोरलाई किल्ल्याकडे आम्ही सर्व टीम रवाना झालो. तिथे पोहचून सूर्यास्त पाहणे होते की नाही अशी धाकधूक होती. वेळ कमी राहिला होता तरीही किल्ल्यावर अगदी सूर्यास्ताला काही क्षण कमी असताना आम्ही पोहोचलो व ते विलोभनीय दृश्य पाहून डोळ्याचे पारणे फिटत होते. अथांग समुद्र आणि किल्ल्याच्या उंचावरून समुद्रात होत असलेला  सूर्यास्त सर्व दोन दिवस परिश्रमाचे शीण  घालणारा होता. मनसोक्त नयनसुख घेऊन कोरलाई किल्ला उतरून परतीच्या प्रवासा कडे आम्ही निघालो. कोरलाई किल्ल्याला लागून असलेला छोटासाच पण नयनरम्य किनारा लगत आम्ही चालत निघालो... बराच वेळ समुद्रकिनारा पाहत सायंकाळ नजरेत सामावून घेत किनाऱ्यालगत समुद्र न्याहाळत बसून राहिलो... जड अंतकरणाने सर्वजण परतीच्या प्रवासा कडे निघालो....

खरोखर दोन दिवसाच्या या भटकंतीत बरंच नवीन अनुभवल सृष्टीसौंदर्य , अभेद्य असा जलदुर्ग, स्वर्ग सुखाची प्रचिती देणारा अथांग समुद्रकिनारा. परशुराम कोकणे सरांची ही भटकंती खरोखरच सर्वांसाठी सुखाची खूप मोठी पर्वणीच आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अतिशय तत्पर लोकांची साथही त्यांना आहे . त्यांच्या मातोश्रीचा उत्साह तरुणाईला लाजवेल असा आहे. बंधू अजित कोकणे हे सतत कोणाला कशाची तसदी होऊ नये, याच्या दक्षतेत असतात . आयोजकाला साथ देणारे वाले सर, मदन पोलके सर, सुंदर छायाचित्रीकरण करणारे गावडे सर, स्वप्नील तडवळ सर अतिशय उत्साही व्यक्तिमत्व व मदतीसाठी तत्पर असलेले ट्रेकर आहेत. भटकंतीमध्ये शेवटपर्यंत उत्साही वातावरण ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न अतुलनीय आहे. आयोजकाचे खरोखरच आम्ही आभारी आहोत.
- सौ. वैशाली रवींद्र डोंबाळे

प्रत्येक ट्रेक दरवेळी नवीन अनुभव देऊन जातो.. ह्यावेळी आपण अनुभवलात.. माझी तर ही सलग सातवी वेळ आहे.. मला मध्यरात्री जरी फोन आला तर मी नक्कीच तयारीत असेन... 
एक परीवार म्हणजे Eco Friendly Club म्हणायला हरकत नाही... आपण कितीही अनोळखी व्यक्तींसोबत असो दुसऱ्या क्षणाला आपण सगळे एक आहोत हे फिलींग यांच्या सोबत मिळतं... ह्या पेक्षा जास्त काय पाहिजे...
आपल्या सर्वांच्या सोबत दोन दिवस म्हणजे जन्मोजन्मीची मैत्रीची गाठ आहे म्हणायला हरकत नाही... आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
- विवेक वाले

Two days economical tour to murud janjeera was full of fun and joy. 
I was curious to know why Our beloved Sambhaji Raje didn't conquer the fort. At that time how hard it was with limited source. But still our Raje made courageous effort. A great salute to him. Suprisingly I came to know regarding Padmdurga which was situated at sea. It was deep down in sea. No one is allowed to visit that place. Isn't astonishing..
Sambhaji Raje was brave, kind hearted and Prakand Pandit. Otherwise how he built that fort? Amazing! Alas, he lived a very short life with tragic end days. History opens our eyes. So, it was janjeera of siddhi johar. But a great one with jal jeera water. And three storeyed building with conspiracy twisted walls was fascinating. Thrilled to know how siddhi johar connected to nigros? 
So many historical moments revealed. 
Water sports of kashid beach was hhah! It was thrilling joy. Specially para sailing. All are the mast.. 
Guest house, food every thing was nice. Enjoyed solekadi of konkan. 
The most admirable charecterstics of Parashram is he is the word of man. 
Be it was a drop to my friend to her home at midnight and a search for missed mobile at night. For that a big hearful thanks to him. 
All friends are jolly. Specifically Gughe couple enjoyed their second honeymoon.

All are real helpful, enjoy able people. I was delighted to have your company. 
My son kartikeya is dancing with joy. Asking the next trip. 
Konkanech konkan trip 
Lai lai bhari. 
- Dr Rajashri Math

मुरुड जंजीरा किल्याची सर्व माहीती सांगनारा अनुभवी गाईड मिळाला. शुक्रवारचा दुपारचा नमाज सोडुन त्यांने आम्हाला सेवा दिली. वालेसरांची फोटोग्राफी व कोंकने सरांचे नीयोजन खुपच वाखानण्याजोगे आहे. समुद्रस्नाचा आनंद घेतला. मोकळ्या मनाचे व सुशिक्षित सर्व सहकारी मिळाल्याने आनंद दुगना झाला. पोटभर नाष्टा करुन परत वाँटरस्पोर्टसाठी समुद्रावर आलो. तीथेही आयोजकांचा चानाक्षपणा अनुभवास आला. 750 चे स्पोर्टस पँकेज त्यांनी 500 रुपयात बसऊन दील्याने सर्वानी त्याचा आनंद घेतला. दोन वेळ छान जेवण,
सकाळी गरम नाष्टा अगदी योग्य वेळी सर्व काही झाले....
एकमेकांना समजुन घेण्याची कला ईको फ्रेडली क्लबला आहे. सेवाभाव प्रचंड आहे.
गाण्याच्या भेंड्या, छोटासा ट्रेक,वीनोद,डान्स...कोकने ताईंनीतर धमाल केली...त्यांचा मोकळा स्वभाव ,वेळोवेळी सर्वांना हवे नको बघने लक्षात राहीले. पुढील ट्रीपची वाट बघत आहे.

- सुधीर गावडे, 
हरीॐ

प्रवासाची आवड होतीच पण प्रत्येक वेळी family tour व्हायची. कोकणे सरांच्या ग्रुपबद्दल, ट्रेकिंग बद्दल ऐकून होते त्यांच्यासोबत जाण्याचा योग पहिल्यांदाच आला.. शेवटपर्यंत यायचे की नाही नक्की होत नव्हते... पण सरांच्या सहकार्यामुळेच मला येता आले. प्रवासादरम्यान सर्वांची आपुलकीने काळजी घेणे .प्रवास म्हणले की काही अडचणी येणारच पण त्यावर मात कशी करायची हे सर्वांच्या सहकार्यातून शिकायला मिळाले...  सूर्योदय होताच निसर्गाच्या जवळ जवळ पोहचत होतो....एक मनात उत्कंठा होती कसा असेल जलदुर्ग (जंजिरा) .....किल्ला पाहताना अंगावर शहारे उभे रहात होते ....खरचं एवढा अभेद्य जंजिरा पाहून मन भरून आले व त्याक्षणी ठरवले की आपला इतिहास जाणून घेण्यासाठी तरी आपण गडभ्रमंती केलीच पाहिजे.....मानाचा मुजरा आपल्या राजांना 
नंतर काशिद बीच वर जी काही मौजमस्ती केली ती मात्र अवर्णनीय हा आनंद केवळ तुम्हा सर्व मित्र मंडळी मुळे च मिळाला....दोन दिवसात चहा,नाष्टा,जेवण  अगदी मस्त होते...कारण आम्हा स्त्रियांना आयते ताट कधी कोणी देत नाही ना ....सरते शेवटी कोर्लाई गडाच्या पायथ्याला रंगलेली गाण्यांची मैफल साथीला अथांग निळाशार शांत समुद्र, मावळतीची किरणे  ......निसर्गाच्या सान्निध्यात मनुष्य किती relax  होतो....कोरोना काळात कोठे येताजाता आले नाही पण या कोकण भटकंती मुळे मनाला सकारात्मक उर्जा मिळाली....सर्व नविन मित्र मैत्रीणींचे आभार.

- स्मिता संतोष घुगे