पुरंदर - राजगड भटकंतीने इतिहास अनुभवला

पुरंदर - राजगड भटकंतीने इतिहास अनुभवला

Eco Friendly Club Purandar Rajgad Trek

इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम 

सोलापूर : निसर्ग पर्यटन वाढावे आणि लोकांमध्ये इतिहासाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या इको फ्रेंडली क्लबच्यावतीने (Eco Friendly Club) किल्ले पुरंदर आणि किल्ले राजगड भटकंतीचे आयोजन करण्यात आले होते. ऐतिहासिक किल्ले राजगडावर नाईट ट्रेक (Rajgad Fort Trek) करून सर्वांनी स्वतःची क्षमता तपासली. या उपक्रमात सोलापूर, पुणे आणि मुंबई येथून निसर्गप्रेमी सहभागी झाले होते. 

8 एप्रिल रोजी सर्व निसर्गप्रेमी चडचणकर ट्रॅव्हल्सच्या (Chadchankar Travels Solapur) लक्झरी बसमधुन पुणे जिल्ह्याकडे रवाना झाले. 9 एप्रिलच्या पहाटे सर्वजण किल्ले पुरंदरच्या पायथ्याला असलेल्या नारायणपूर येथील श्री. तानाजी बोरकर यांच्या हॉटेल पुरंदर प्राईड (Hotel Purandar Pride, Narayanpur) येथे पोचले. पहाटे लवकर सर्वांनी फ्रेश होऊन चहा - नाष्टा केला. सर्वांनी नारायणपूर येथील श्री एकमुखी दत्त महाराजांचे दर्शन घेतले. 

Hotel Purandar Pride, Narayanpur

भारतीय सैन्य दलाच्या (Indian Army) ताब्यात असलेल्या किल्ले पुरंदरच्या दिशेने सर्वजण बसप्रवास करत रवाना झाले. किल्ले पुरंदर येथील भारतीय सैन्य दलाच्या चेक पोस्टवर सर्वांनी आधार कार्ड दाखवून किल्ल्यात प्रवेश केला. वीर मोरारबाजी देशपांडे यांच्या स्मारकापाशी नतमस्तक होऊन सर्वांनी किल्ला दर्शनाला सुरुवात केली. भारतीय सैन्य दलाने नव्याने तयार केलेल्या ‘छत्रपती संभाजी महाराज वंदनस्थळ’ या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला सर्वांनी भेट दिली. स्मारकात असलेले विविध गडकोटांची, मावळ्यांची छायाचित्रे पाहून, माहिती वाचून सर्वांनी भारतीय सैन्य दलाच्या उपक्रमाचे कौतुक केले.

त्यानंतर हॉटेल पुरंदर प्राईडचे निखिल बोरकर आणि इको फ्रेंडली क्लबचे समन्वयक अजित कोकणे यांनी किल्ले पुरंदरचा इतिहास सर्वांना सांगितला. छत्रपती संभाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या आणि ऐतिहासिक पुरंदरचा तह झालेल्या किल्ले पुरंदरचा इतिहास ऐकून सर्वजण भावुक झाले. ‘छत्रपती शिवाजी महाराज कि जय... आणि छत्रपती संभाजी महाराज कि जय...’ या घोषणेने सर्वांनी परतीचा प्रवास सुरु केला.

Purandar Fort

Purandar Fort

Purandar Fort

Purandar Fort

Hotel Purandar Pride, Narayanpur

हॉटेल पुरंदर प्राईडमध्ये दुपारच्या जेवणानंतर सर्वांनी किल्ले राजगडचा प्रवास सुरु केला. बस प्रवास करत सर्वजण सायंकाळच्या सुमारास किल्ले राजगडाच्या पायथ्याला असलेल्या गुंजवणे गावात पोचले. राहुल बांदल यांच्या सुवेळा गार्डन येथे फ्रेश होऊन राजाराम रसाळ यांच्याकडे सर्वांनी वडापावचा आस्वाद घेतला. 

इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे आणि समन्वयक महेंद्र राजे यांनी सर्वांना ट्रेकिंगच्या अनुषंगाने सूचना दिल्या. पुन्हा एकदा ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय... आणि छत्रपती संभाजी महाराज की जय...’ या घोषणेने सर्वांचा किल्ले राजगडचा नाईट ट्रेक सुरु झाला. गुंजवणे गावातून जाणाऱ्या चोर दरवाजाच्या मार्गे टॉर्चच्या उजेडात सर्व शिवप्रेमी ट्रेकिंग करत सुरक्षितपणे पद्मावती माचीवर पोचले. अनेकांचा नाईट ट्रेकचा हा पहिलाच अनुभव होता. ट्रेकिंग करून सर्वजण आनंदून गेले.

Rajgad Night Trek - Dr. Asha & Dr. Harshad Wagaj

Rajgad Fort - Tent

Rajgad Fort

10 एप्रिलच्या पहाटे सर्वांनी फ्रेश होऊन सकाळी लवकर किल्ले राजगडाच्या बालेकिल्ल्याकडे दिशेने ट्रेकिंग सुरु केले. उगवत्या सूर्याची सोनेरी किरणे सह्याद्रीच्या डोंगररांगेवर पडताना पाहून सर्वांमध्ये उत्साह संचारला. किल्ले राजगडाच्या बालेकिल्ल्यावर जाऊन अनेकजण तिथल्या वाड्यांचे अवशेष पाहून अनेकजण भावुक झाले. बालेकिल्ल्यावरून सुरक्षितपणे खाली येऊन सर्वजण चहा नाश्ता केला. त्यानंतर सुवेळा माची, संजीवनी माची पाहण्यासाठी निघाले. सुवेळा माचीजवळ असलेल्या नेढ्यामध्ये जाऊन छायाचित्रे काढण्याचा मोह निसर्गप्रेमींना आवरला नाही. 
 

Suvela Machi, Rajgad Fort

Sanjivani Machi, Rajgad Fort

Rajgad Trek

Rajgad Trek

Rajgad Fort Nedha

Rajgad Fort

दुपारच्या जेवणानंतर सर्व निसर्गप्रेमी पाली दरवाजा मार्गे गडउतार झाले. परतीच्या प्रवासात हॉटेल राजगड निवारा येथे सर्वांचे रात्रीचे जेवण झाले. हॉटेल मालक विकास नलावडे आणि कुटुंबीयांनी जेवणाचे छान नियोजन केले होते. 

Purandar Rajgad Trek - Pune Team

इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वय सटवाजी (अजित) कोकणे, पुण्याचे समन्वयक महेंद्र राजे, ज्येष्ठ सदस्य माधव वडजे, ललित मगदूम, संतोष घुगे, संतोष तडवळ, सारिका दूधनीकर, वैशाली डोंबाळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या निसर्ग भ्रमंतीमध्ये सोलापूर येथून पोलीस अंमलदार श्रीरंग कुलकर्णी, राजश्री जांबेनाळ, अभिराज वास्ते, प्रचिती पंचे, धानम्मा बब्बे, आकांशा डोंबाळे, माधुरी साबळे, स्वाती निकम, अश्विनी गड, संगीता उरडे, कृपाचार्य शहाणे, अरविंद ताटे, परम मगदूम, रिया मगदूम, स्मिता घुगे, संस्कार कदम, यश होटकर, सोनाली खानापुरे, रजनी कंदीकटला, आनंद कोळी, महादेवी कोळी, मयुरी जोशी, गंगुबाई कोकणे, शर्वरी इंगळे, प्रियांका इंगळे, विजय इंगळे, सोनाली इंगळे, शौनक इंगळे, सार्थक आसबे, समर्थ होटकर, आदित्य गंभीरे, आदित्य शिंदे, केतन लामतुरे, सुयोग जखोटिया, समर्थ राठोड, अभी जाधव, हितेश भराडिया, गिरीश स्वामी, सोहम गुडपल्ली, डॉ. आशा वागाज, डॉ. हर्षद वागज, ओजस वागज आणि पुणे येथून स्वप्नील हरेर, मयुरी शिंदे, धैर्यशील नकडे, अक्षय शिंगाडे, बालाजी मस्के, योगेश शिंदे, पूजा जाधव, आर्यन शिंदे, आस्था माने, स्नेहल कल्याणशेट्टी, पूजा चव्हाण, वैभव माळवे तसेच मुंबई येथून पोलीस अधिकारी महेश गुरव, गोपाळ भोसले, भास्कर पाटील आदी सदस्य सहभागी झाले होते.

ही निसर्ग भ्रमंती आनंददायी होण्यासाठी चडचणकर ट्रॅव्हल्सचे संचालक सोमनाथ चडचणकर, बस चालक श्री. सुतार, सहाय्यक आतीश तांबे यांचे सहकार्य लाभले.

इको फ्रेडली क्लबची पुढील भटकंती -
Summer Special Tour
⛳किल्ले प्रतापगड भटकंती

For More Info
Contact
8888856530 / 9021221114