रायगडावर केली नववर्षाची सुरुवात; इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम

रायगडावर केली नववर्षाची सुरुवात; इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम

Eco Friendly Club Raigad Trek News

सोलापूर : निसर्गाच्या सानिध्यात नववर्षाचे स्वागत या संकल्पनेअंतर्गत इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून रायगड किल्ला आणि महाड परिसरात भटकंतीचे आयोजन करण्यात आले होते.


30 डिसेंबर रोजी रात्री होम मैदान परिसरातून प्रवासाला सुरुवात झाली. सामाजिक कार्यकर्ते आणि मनसचे पदाधिकारी जैनोद्दीन शेख, जितेंद्र टेंभूर्णीकर यांनी सर्व निसर्गप्रेमींना रायगड भटकंतीसाठी शुभेच्छा दिल्या. 31 डिसेंबर रोजी पहाटे महाड येथील बी.एस.बुटाला सांस्कृतिक भवनमध्ये सर्वजण फ्रेश झाले. दिलीप साने यांच्या संपर्कातून छान व्यवस्था झाली. फ्रेश झाल्यानंतर सर्वांनी भुस्कुटे स्कॅक्स कॉर्नरमध्ये पोचले. श्री. व सौ. भुस्कुटे यांनी चहा-नाश्त्याचे छान नियोजन केले होते. सकाळी महाड येथील चवदार तळ्याला भेट देऊन सर्वांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. भटकंतीमध्ये सहभागी सदस्य मदन पोलके यांनी चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची माहिती दिली. 

दुपारी महाड जवळील मुंबई-गोवा महामार्गावरील गांधारपाले येथील लेणी समूहाला भेट देऊन निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला. दुपारी महाडमध्ये समृध्दी हॉटेलमध्ये जेवण करुन इकोफ्रेंडली क्लबची टीम रायगडच्या दिशेने निघाली. सायंकाळी पाचाड येथील जिजाऊंच्या समाधीस्थळाला भेट देवून सर्वजण नतमस्तक झाले. त्यानंतर रायगडाजवळील वाघबीळ येथे जाऊन सर्वांनी सूर्यास्त पाहिला. रात्री रायगडच्या पायथ्याला असलेल्या सिराज सय्यद यांच्या रायगड फार्म हाऊसमध्ये मुक्कामाची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

Video : Raigad | Part 1 | राजमाता जिजाऊ मासाहेब समाधी - 

शनिवारी नववर्षाच्या पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज की जय.., छत्रपती संभाजी महाराज की जय.. या घोषणा देत सर्वांनी रायगड किल्ला भटकंतीला सुरुवात केली. स्थानिक गाईड रामचंद्र औकीरकर यांनी रायगड किल्ला आणि परिसराची माहिती दिली. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुढाकारातून रायगडावर सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करून सर्वांनी आनंद व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजवाडा, समाधीस्थळ, जगदीश्वर मंदिर, टकमक टोक यासह रायगडावरील विविध ठिकाणांना भेट देऊन सर्वांनी इतिहास जाणून घेतला. स्थानिक गाईड रामचंद्र औकीरकर हे गेल्या अनेक वर्षांपासून रायगडचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत आहेत, याबद्दल रामचंद्र औकीरकर यांना इको फ्रेंडली क्लबच्यावतीने उत्साही गाईड म्हणून सोलापूरची चादर भेट देऊन, फेटा बांधून सन्मानित करण्यात आले.

युरोप खंडातील सर्वोच्च एल्ब्रुस शिखरावर भगवा फडकावून कमी वयाचा ट्रेकर म्हणून जागतिक रेकॉर्ड केल्याबद्दल इकोफ्रेंडली क्लबच्यावतीने डॉ. आशा आणि डॉ. हर्षद वागज यांचे चिरंजीव कुशाग्र याचा रायगडावर फेटा बांधून, सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी त्यांचे काका शुभम वागज, काकु अंजली वागज उपस्थित होते. इको फ्रेंडली क्लबसोबत गडकोट भ्रमंतीची सुरवात करुन कुशाग्रने लहान वायात अनेक गडकोटांवर भटकंती केल्यानंतर सर्वांनी त्यांचे कौतूक केले. 


दुपारी रायगडावर पिठलं, तांदळाची भाकर, उसळ, वरण, भाताचे मस्त जेवण करुन रायगडावरुन परतीचा प्रवास सुरु केला. रात्री आंबेनळी घाटातून वर आल्यानंतर प्रतापगडाजवळील प्रतापगड कॉर्नर ढाब्यावर जेवण केले. हॉटेल मालक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, सुरेश सपकाळ, अविनाश सपकाळ यांनी जेवणाचे छान नियोजन केले होते. जेवणाच्या ठिकाणी सर्वांनी दोन दिवसाच्या भटकंतीविषयी आपली मनोगते व्यक्त केली. 

रविवारी पहाटे सर्वजण सोलापुरात परतले. प्रवास सुखकर होण्यासाठी चडचणकर ट्रॅव्हल्सचे संचालक सोमनाथ चडचणकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालक पितांबर घोरपडे, सहकारी आतिश तांबे यांचे सहकार्य लाभले. इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वयक अजित कोकणे, दुर्गा थिटे, सोनाली थिटे, मलिका पाटील, पुण्याचे समन्वयक महेंद्र राजे, पंढरपूरच्या सदस्या मनीषा वासकर, प्रा. स्नेहल चाकोरकर, नळदुर्गच्या सदस्या अनिता चव्हाण, मार्गदर्शक माधव वडजे, मदन पोलके, अरविंद ताटे, संतोष घुगे, राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या नववर्षाच्या निसर्ग भ्रमंतीमध्ये स्मिता घुगे, सविता शिंपले, प्रथमेश कोळी, केतन राचमले, अभिषेक चव्हाण, रेणुका चव्हाण, सोहम थिटे, मयुरी जोशी, आर्यन शिंदे, गंगुबाई कोकणे, मंगेश माने, गौरी माने, समृद्धी डोंगरे, ऋतुजा पवार, श्रेया केसकर, आदित्य गंभीरे, कुशाग्र वागज, शुभम वागज, अंजली वागज, प्रियंका इंगळे, शर्वरी इंगळे, महेश जाधव, वैष्णवी अघोर, अपूर्वा अरविंद कुलकर्णी, अनुष्का चिवटे, सोनाली जगताप, रितेश जगताप, केतन लामतुरे, मैथिली कुलकर्णी, अपूर्वा कुलकर्णी, महानंदा वडजे, रणधीर म्हेत्रे, संतोषकुमार तडवळ, विवेक वाले यांनी सहभाग नोंदविला.

इको फ्रेंडली क्लबचा पुढील ट्रेक व्हेलेंटाईन डेच्या निमित्ताने निसर्गावर प्रेम करा.. या थीमनुसार सर्वोच्च साल्हेर किल्ला परिसरात आयोजित करण्यात येणार आहे. 13 आणि 14 फेबु्रवारी 2022 या तारखांना ही भटकंती होणार आहे. अधिक माहितीसाठी 8888856530 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.