गडचिरोलीतील कामासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना एक्सलन्स अवार्ड 

गडचिरोलीतील कामासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना एक्सलन्स अवार्ड 

सोलापूर : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेमार्फत सन 2020 या वर्षाकरिता देण्यात येणारा अरुण बोंगिरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स अवार्ड सोलापूर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना जाहीर झाला आहे. 

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे हे सोलापूरला येण्याआधी गडचिरोलीमध्ये होते. त्यांनी तिथे केलेल्या कामाची दखल घेऊन अरुण बोंगिरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स अवार्डसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. 

गेल्या आठवड्यात झी चोवीस तासने सोलापूर पोलिस आयुक्तालयास सर्वात शांत पोलिस आयुक्तालयाचा पुरस्कार दिला आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या कामाबद्दल सोलापूरकरांमधून सकारात्मक प्रतिक्रीया येत आहेत. अरुण बोंगिरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स अवार्ड जाहीर झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन होत आहे. 

स्मार्ट सोलापूरकर परिवाराच्यावतीनेही पोलिस आयुक्त शिंदे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.