फेसबुक, व्हाट्सअप अन् इंस्टाग्राम झाले होते डाउन!

फेसबुक, व्हाट्सअप अन् इंस्टाग्राम झाले होते डाउन!

सोलापूर : फेसबुक व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म काल रात्री नऊपासून पहाटे सव्वा तीनपर्यंत बंद झाले होते.

सर्वर डाऊन झाल्यामुळे फेसबुक व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम सर्वर डाऊन झाल्याचे फेसबुक आणि व्हाट्सअप यांनी कळवले असेल ट्विटरवर दिलगिरी व्यक्त केली आहे. ट्विटरवर अनेकांनी इमोजी टाकून फेसबुक, व्हाट्सअप बंद असल्याचे सांगितले.

सोमवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास अचानकपणे फेसबुक, व्हाट्सअप आणि इन्स्टाग्राम पूर्णपणे बंद झाले. 

आज रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी फेसबुक, व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम पूर्णपणे बंद झालं. 2-5 मिनिटे वाट पाहिल्यानंतर सर्वांनी एकमेकांना चौकशी करायला सुरुवात केली. अगदी अनेकांनी आपला स्मार्ट फोन बंद करून पुन्हा चालू केला. तरीसुद्धा फेसबुक व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम सुरू झालं नाही. या संदर्भातील बातम्या टीव्ही चॅनल्सवर दिसू लागल्या आणि मग लक्षात आलं की फेसबुक कंपनी अंतर्गत कार्यरत असलेले फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअप हे सोशल मीडिया पूर्णपणे बंद झाले आहे.

‘आम्हाला माहिती आहे की काही लोकांना फेसबुक ॲपमध्ये प्रवेश करण्यात समस्या येत आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर गोष्टी पूर्ववत करण्यासाठी काम करत आहोत आणि कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.’ असा संदेश फेसबुकच्या वतीने ट्विटरवर पोस्ट करण्यात आला. फेसबुक, व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम बंद असताना ट्विटर चालू होते. पहाटे सव्वा तीनच्या सुमारास फेसबुक, व्हाट्सअप  पुन्हा सुरू झाले. तांत्रिक अडचणीमुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. याबाबतचे नेमके कारण अद्याप फेसबुक कडून सांगण्यात आले नाही.