व्वा मस्तच! रोहित पक्ष्यांचे सोलापुरात आगमन

व्वा मस्तच! रोहित पक्ष्यांचे सोलापुरात आगमन

Greater Flamingo In Solapur 

सोलापूर : गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने हिप्परगा तलावात मुबलक पाणीसाठा होता. पाणथळीच्या जागा उपलब्ध नसल्याने या ठिकाणी खाद्य मिळत नव्हते. त्यामुळे यंदा Greater Flamingo म्हणजे रोहित / अग्निपंख पक्ष्यांचे आगमन लांबणीवर पडले होते. त्यामुळे पक्षीप्रेमींची निराशा झाली होती. त्यांच्या आगमनाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत होते.

Video - 

गेल्या दीड वर्षापासून हिप्परगा तलाव 100 टक्के भरून असल्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांची संख्या घटली आहे.  त्याच बरोबर रोहित पक्ष्यांचा मुक्काम देखील कमी प्रमाणात होत चालला आहे. शेकडोंच्या संख्येने येणारे रोहित पक्षी मागील दीड ते दोन वर्षांपासून यांच्या संख्येत कमालीची घट होत चालली आहे. पाणथळी जागा घटलेली असून शेवाळ व चिखलात मिळणारे खाद्य यामध्ये कमालीची घट झाली आहे.

यंदा देखील रोहित पक्ष्यांचे आगमन सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली आहे, परंतु 35 ते 40 या संख्येने हे पक्षी आपल्या सोलपुरातील हिप्परगा तलावावर दाखल झालेले आहेत, अशी माहिती पक्षी अभ्यासक संतोष धाकपाडे यांनी दिली आहे.

Photos : Santosh Dhakpade