हरीश बैजल सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त!

हरीश बैजल सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त!

सोलापूर : भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी हरीश बैजल यांची सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

विद्यमान आयुक्त अंकुश शिंदे यांची मुंबईला पदोन्नतीवर 23 ऑगस्ट रोजी बदली झाली होती. त्यांच्या जागी ठाण्याहून दत्ता कराळे हे बदलून येणार होते. मात्र ते आले नाहीत. यामुळे गेले महिनाभर अंकुश शिंदे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार पाहत होते. शासनाने शुक्रवारी सायंकाळी नवीन दोन बदल्यांचे आदेश काढले. त्यात हरीश बैजल यांची सोलापूरच्या आयुक्तपदी येणार आहेत.

यापूर्वी ते गोंदिया या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. 
हरीश बैजल सध्या महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक आहेत. सायकलवर प्रवास करणारा अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. वेगवेगळ्या सायकल मोहिमांमध्ये ते उत्साहाने सहभागी होत असतात. लवकरच सोलापूरचा पदभार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.