आज लंडन खऱ्या अर्थाने भारतासमोर नतमस्तक झाला!

आज लंडन खऱ्या अर्थाने भारतासमोर नतमस्तक झाला!

दक्षिण लंडनमध्ये थेम्स नदीच्या तटावर सररे या स्थानिक रणजी क्रीडा समूहाचे ओव्हल नावाचे सुंदर मैदान आहे. माझे बाबा जेंव्हा जन्मले तेंव्हा म्हणजेच १९७१ साली भारताने पहिल्यांदा इथे सामना जिंकला होता आणि आता २०२१ मध्ये तब्बल ५० वर्षांनी दुसरा सामना इथे आपण जिंकला. त्यावेळी सुद्धा मुंबईच्या मराठी गावस्करांनी इथे शतक झळकावले आणि यावेळी मुंबईचे मराठी २ खरे वाघ रोहित शर्मा याने शतक तर शार्दूल ने २ पन्नास आणि महत्वाच्या लोकांचा त्रिफळा फोडला. एकेकाळी पारतंत्र्यात हे शहर आपला तिरस्कार करत होते भारतीयांना हीन हीन वागणूक दिली जायची आज त्याच शहरात आपण विजय मिळवला. ती लंडन ची संसद इमारत, ती थेम्स नदी आणि तो लंडन चा पाळणा आज खऱ्या अर्थाने भारतासमोर नतमस्तक झाला. शेवटच्या दिवशी भारताला सामना जिंकायला १० गाडी बाद करणे आवश्यक होते आणि खेळपट्टी ही फलंदाजांसाठी स्वर्गासारखी सुयोग्य होती मात्र आपली सातत्य पूर्ण आणि नेम धरून टाकलेली गोलंदाजी काही औरच होती. विजयात जेवढे श्रेय शार्दूल रोहित चे आहे तेवढे बुमराह उमेश आणि जडेजाचे सुद्धा आहे. काही वेळेला अर्जुन आणि भीमा समोर बाकीचे पांडव जरा दुर्लक्षित होतात मात्र त्यांचे योगदान हे तेवढेच महत्वाचे असते. जय हिंद.
- समर्थ देशपांडे