शुक शुक.. 13 वर्षांपासून बंद घरातुन येताहेत चित्रविचित्र आवाज!

शुक शुक.. 13 वर्षांपासून बंद घरातुन येताहेत चित्रविचित्र आवाज!

Indian barn owl  News 

सोलापूर : कुमठा नाका परिसरात रेणुका देवी अपार्टमेंट , दुसरा मझला , घर नं 201 हे गेले 13 वर्षापासुन बंद आहे. मागील दोन तीन दिवसापासुन रात्री बंद खोलीतुन फुस्स, शुक शुक , सिर सिर , टँक्य मानवी वाटावे असे आवाज ऐकु येत होते. शेजारील लोक भयभीत झाले होते.

कोणी म्हणाले बंद घरावर भुतांनी कब्जा केला तर कोणी म्हणाले घरात सापांनी कब्जा केलाय. आवाज फक्त रात्रीच्या वेळीच ऐकु येत होते. रात्री बारानंतर आवाजाची तीव्रता वाढते. शेजारील लोकांनी ही घटना पोलिसांना कळवली. पोलिस आले घराला कुलूप असल्याने आतुन पाहणी करता आली नाही. सकाळी कुलुप तोडुन पाहणी करुया असे ठरले. 

घटनेची माहिती वन्यजीव प्रेमी संस्था सदस्य सिद्धेश्वर मिसालोलु व गणेश तुपदोळे यांना समजली. रात्रीच्यावेळी दोघे घटनास्थळी पोहचले. त्यांनाही विचित्र आवाज ऐकु येत होते. घोणस किंवा नाग सापाचे आवाज असावेत का समजुन त्यांनी आवाज रेकॉर्ड केला. आवाज रेकॉर्ड त्यांनी वन्यजीव प्रेमी मुकुंद शेटे यांना पाठविले. मुकुंद शेटे यांनी आवाज व्यवस्थित ऐकुन आवाज मागील कारण सांगितले.

हे आवाज कोणा सापाचे नसुन ते गव्हाणी घुबडाचे आहेत. घराच्या खिडक्या उघड्या आहेत का पाहण्यास सांगितले. दुसरा मजल्यावरुन मिसालोलु व तुपदोळे खाली उतरून पाहणी केली तेंव्हा सर्व मेन खिडक्या बंद होत्या.परंतु मागील बाजुस असणाऱ्या बाथरूमची खिडकी काच फुटलेली दिसत होती.मागील भाग खुपच आडचणीचा व झाडी वाढल्याने जाता येत नव्हते. लांबुन स्टॉर्च खिडकीत मारले असता खिडकीतून दोन गव्हाणी घुबड दिसुन आले.  शेजारील सर्वांची भिती क्षणात पळुन गेली. व सर्वांना हासु आले. सोमवारी सकाळी मुकुंद शेटे यांनी घटनास्थळी भेट दिली. गव्हाणी घुबडाची पीसे व विष्टा आढळुन आली. बंद घर कुलुप न तोडण्याची विनंती करण्यात आली.

घुबडानी बंद घरात घरटे केले असणार व घरट्यास व पिल्लांना संभाव्य धोका नको, असे त्यांनी सांगितले.

गव्हाणी घुबड Indian barn owl
भारतात सर्वत्र आढणारे घुबड, पांढरट फिक्कट राखाडी रंगाचे घुबड. चेहरा बदाम (दिल) आकाराचा दिसतो. सुंदर घुबड म्हणून ओळखले जाते. जुने वाडे, किल्ले, पडकी घरे, बंद घरे  अपार्टमेंटमध्ये आपली घरटी बनवितात. नर मादी दोघे मिळुन पिल्लांचे संगोपन करतात. एक घुबड एका रात्री पाच ते सहा उंदीर मारून खाते. पिल्लांचे संगोपन वेळी एक गव्हाणी जोडी ऐका रात्री दहा ते पंधरा उंदीर मारतात म्हणून त्यांना शेतकरी मित्र म्हणुन ओळखले जाते.