हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायात स्थानिकांना कामाची संधी

हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायात स्थानिकांना कामाची संधी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पूर्ण जगात झाला आहे. कोरोना विषाणूमुळे जग धास्तावले आहे. अनेकजण मृत्यूच्या जाळ्यात सापडत आहेत. अशावेळी प्रत्येक जण घाबरलेल्या मनस्थितीत आहे. अशावेळी अनेक उद्योग धंदे  संकटात सापडले आहेत. त्यापैकी एक उद्योग धंदा म्हणजे हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसाय... 

संपूर्ण जगात हॉटेल व्यवसाय बाधित झालेला आहे. अशावेळी हॉटेल व्यवसायाला सावरण्याचे आव्हान सरकार तसेच हॉटेल व्यावसायिकांवर आहे. रेस्टॉरंट बिजनेस सुद्धा खूप बाधित झाला आहे. अनेक आव्हाने या व्यवसाय समोर आहेत, आधीच महागाईने त्रस्त असलेल्या हॉटेल व्यवसाय कामगारांच्या स्थलांतरामुळे व इतर अनेक आव्हानामुळे डबघाईला आला आहे. या व्यावसायाला सावरण्याची नितांत गरज आहे.  हॉटेल- रेस्टॉरंट व्यवसायाला ऑक्सिजनची गरज असावी असे सर्वांचे मत आहे. कामगारांचे स्थलांतर झाल्यामुळे कामगार कमी पडतील असे एकंदरीत चित्र दिसत आहे. माणूसच माणसाला सेवा देतो आणि अशा परिस्थितीमध्ये हे कर्मचारी कमी पडल्यावर व्यवसायावर परिणाम होणार आहे. 

टाळेबंदीमुळे व्यवहार ठप्प आहेत. तीन महिन्यापासून उत्पन्न नाही आणि मूळ खर्च कसा करायचा हा प्रश्न निर्माण होत आहे. लाईट, पाणी, कर यासारखे मूलभूत खर्च करावेच लागणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये दोन्हीकडून हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायाला नुकसान सहन करावे लागत आहे. रेस्टॉरंट बिजनेसमध्ये स्वच्छ व सुरक्षित अन्न द्यायचे आव्हान या व्यवसायावर आहे. खवय्ये ग्राहकांसाठी रेस्टॉरंट नेहमीच तत्पर होते, पण आता फक्त सुरक्षा लक्षात घेऊन अन्नपदार्थ तसेच आवडीचे पदार्थांची सेवा देण्यात तत्पर राहील. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ग्राहक रेस्टॉरंटमध्ये अन्नपदार्थांचा आनंद घेण्यास येतील, अशी आशा आहे.

शासनाने व्यवसायाला सुरुवात करून कर दरात कपात करावी असे सर्वांनाच वाटते. याचा फायदा ग्राहक व मालक अशा दोघांनाही होणार आहे. हॉटेल व्यवसायांमध्ये हे स्थानिकांना काम करण्याची संधी मिळणार आहे, त्यामुळे रोजगार निर्मिती पण होणार आहे, अशा परिस्थितीत आलेली संधी सोडू नये, असे व्यवसायिक म्हणतात. नवीन पद्धतीचे ऑनलाईन ऑर्डर सिस्टीम तयार करून अन्नपदार्थ लोकांपर्यंत पोचवावेत. सुरक्षा ही पहिली जबाबदारी राहील. हॉटेलमध्ये येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा करणे हे व्यवसायिकांची जबाबदारी चांगली पार पाडत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाने हॉटेल व्यवसाय डबघाईला आहे, त्याला सावरण्याची नितांत गरज आहे. अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न प्रत्येक हॉटेल व्यवसायिक करेल व रेस्टॉरंटमध्ये रुचकर अन्न देण्याचा प्रयत्न रेस्टॉरंट उद्योजक करेल अशी आशा आहे. नवीन पद्धती वापरून जसे की स्वच्छता करणे, हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, मास्क वापरणे व अन्नाशी हाताळणी करताना सुरक्षा घेणे हे सर्व व्यवसायिकांना करावे लागेल. त्यामुळे ग्राहकांचा फायदा होईल व व्यवसायाला चालना मिळेल एकंदरीतच हॉटेल व रेस्टॉरंट बिजनेसला पुन्हा जीवनदायी देण्याची गरज आहे. शासनाने योग्य ते निर्णय घेऊन या व्यवसायाला पुन्हा उभारण्याची संधी दिली पाहिजे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन हा व्यवसाय पुन्हा उभा राहील अशी आशा आहे.
- ऋत्विज चव्हाण, 
अंजठा हॉटेल, सोलापूर

- ऋत्विज चव्हाण,  अंजठा हॉटेल, सोलापूर