निवृत्त पोलिस अधिकारी काळूराम धांडेकर यांचे निधन

निवृत्त पोलिस अधिकारी काळूराम धांडेकर यांचे निधन

Kaluram Dhandekar News

सोलापूर : निवृत्त पोलिस अधिकारी काळूराम धांडेकर यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह यासह विविध अवार्ड त्यांना मिळाले होते.

शहर पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काळूराम धांडेकर यांनी केलेली कामगिरी स्मरणात राहणारी आहे. मनमिळावू आणि मोठा जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.

काळूराम धांडेकर हे पोलीस खात्यात रुजू झाले होते. 2009 साली ते पोलीस निरीक्षक झाले. सोलापुरात त्यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाणे तसेच विशेष शाखा या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कर्तव्य बजावले होते. 2014 साली ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या कार्यकाळात सोलापुरात पोलीस आयुक्त म्हणून प्रदीप रासकर, पोलिस उपायुक्त म्हणून पी.आर.पाटील, स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून खुशालचंद बाहेती, सी. आर. रोडे हे कार्यरत होते.

पोलीस खात्यातून निवृत्त झाल्यानंतर ते आपल्या मूळ गावी म्हणजेच पुण्यात वास्तव्यास होते. ते पुण्यात इंद्रायणी होस्टेल चालवायचे. निवृत्तीनंतर विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असायचा.

मिळालेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी काळूराम धांडेकर हे चारधाम तीर्थक्षेत्र या ठिकाणी गेले होते. त्यांना रविवारी हृदय विकाराचा झटका आला.

सोमवार दिनांक 25 रोजी रात्री नऊ वाजता कोंढवा बु स्मशानभुमी येथे धांडेकर यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. स्मार्ट सोलापूरकर परिवाराच्या वतीने भावपूर्ण आदरांजली.