बिबट्याला ठार केलं ! यश का अपयश? वाचा काय म्हणाले वनअधिकारी...

बिबट्याला ठार केलं ! यश का अपयश? वाचा काय म्हणाले वनअधिकारी...

सोलापूर : नरभक्षक बिबट्याला ठार केल्यानंतर वन विभागाचे आणि शार्प शुटरचे कौतूक होत आहे. सोलापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी हे आमचे यश नाही तर अपयश असल्याचे शनिवारी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. 

वाचा - लिंबोणीच्या बागेत फक्त तिचं मुंडकं दिसलं अन्...

निसर्ग साखळीत बिबट्याची भूमिका महत्वाची आहे. नरभक्षक ठरलेल्या एखाद्या वन्यप्राण्याला गोळी मारून ठार करावे लागणे हे वन विभागासाठी खूपच आव्हानात्मक होते. एका वन्यप्राण्याला आम्हाला मारावे लागले हे आमच्यासाठी अपयश असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. शासनाच्या आदेशानुसारच धवलसिंह मोहिते-पाटील यांनी बिबट्याला ठार केल्याचे उपवनसंरक्षक पाटील यांनी सांगितले. 

वाचा - भिवरवाडीतील हल्ला बिबट्याचा नाही ‘या’ प्राण्याचा!

बिबट्याला अकलुजचे धवलसिंह मोहीते-पाटील यांनी गोळी घालून ठार केल्याचे सांगितले जात आहेे. वन विभागापेक्षा धवलसिंह यांचेच जास्त कौतूक होत आहेे. उपवनसंरक्षक पाटील यांनी आपल्या पत्रकार परिषदेत स्वतःहून धवलसिंह यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. पत्रकारांनी विचारल्यावर होय धवलसिंह यांनीच बिबट्याला मारल्याचे पाटील यांनी सांगितले. 

वाचा - बिबट्याच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या पतीला नोकरी

दिनांक 18.12.2020 रोजी सायंकाळी अंदाजे 6.20 च्या सुमारास मौजे बिटरगाव वांगी, ता.करमाळा, जि. सोलापूर या ठिकाणी कारवाई मध्ये सोलापूर, पुणे व जुन्नर वनविभागाचे कर्मचारी, पोलीस व राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी, RRU टिम औरंगाबाद, डॉगस् स्कॉड, ड्रोन पथक, शुटर्स व इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

वाचा -  बिबट्या पुन्हा ॲक्टिव्ह; शेतात काम करणाऱ्या महिलेवर झडप!

 यामध्ये दिनांक 03.12.2020 पासून जवळपास 120 जणांना छोटया-छोटया 15 टिममध्ये विभागलेले होते. या सर्व टिमनी दररोजची गस्ती, जनजागृती करत लोकांकडून आलेले कॉल घेतले, तसेच अफवांचे ही निरसन केले. काळात तंत्रज्ञानाचा वापर करत सोलापूर वनविभागाने आपले कंट्रोल रुम करमाळा येथील वन्यजीवच्या कार्यालयात बनविलेले होते. नियमितपणे याठिकाणी आलेल्या माहितीचे संकलन (डाटा कलेक्शन), माहितीचे पृथक्करण (डाटा ॲनालेसिस), माहितीचे सादरीकरण (डाटा मॅपिंग) केले. सदरची माहिती मुख्यत्वे पायांचे ठसे व लोकांचे आलेले कॉल या स्वरुपामध्ये होती. या माहितीचाच वापर करुन सदरच्या प्राण्यांचे अस्तित्व कळू शकले. जसे कि एखाद्या भागातून जास्त ठसे मिळाले तर सर्व टिम त्या ठिकाणा भोवती केंद्रकिय पध्दतीने पाठविल्या जात होत्या. तसेच छोटया-छोटया टिम वेगवेगळया भागांमध्ये ठेवल्यामुळे प्रतिसाद (Response time) तात्काळ होत होता व लोकांच्या शंकाचे निरसन व्यवस्थित होत होते. सदरच्या टिमच्या वेगवेगळया ठिकाणच्या मांडणीला संशोधनामध्ये Hub and Spoke Model असेही म्हणतात.

वाचा -  बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश; ड्रोन कॅमेऱ्यासह डॉग स्कॉड‌ आले! 

सोलापूर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दि. 7, 10, 11, 17 रोजी नियमित गस्तीत अथवा कारवाईमध्ये सदरचा प्राणी आढळून आला होता. यामध्ये दि. 17 डिसेंबर 2020 रोजी सदरच्या प्राण्याचे अस्तित्व तिन्ही बाजूंनी उजनी धरणाच्या पाण्याने वेढलेल्या व एका बाजूने लोकवस्ती आणि टेंभूर्णी-करमाळा रस्ता याने वेढलेल्या भू-भागामध्ये असल्याचे सिध्द झाले होते. दि. 10 डिसेंबर 2020 रोजीचा बिबटयाने हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न याच भागात होता. तसेच 11 डिसेंबर 2020 रोजी मौजे ढोकरी या ठिकाणी श्री.गायकवाड(वनरक्षक) यांना गस्त वेळी याच भागात आढळला होता.   

वाचा -  करमाळ्यात आलाय धडापासून मुंडके वेगळे करणारा बिबट्या!

दि. 18 डिसेंबर 2020 रोजी आधीच्या दिवशी ज्या भागांमध्ये सदरचा वन्यप्राणी आढळून आला होता. त्याच परिसरामध्ये अंदाजे 80 कि.मी. ची पायी गस्त वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची चालू होती. यामध्ये दुपारी 2.00 वा. चे सुमारास नलवडे वस्ती जवळ बिबटया सदृश्य प्राण्याचे ठसे आढळून आले असता डॉग स्कॉडने त्याचा माग घेतला. या सुमारास दिलेल्या सूचनांचे पालन करत सर्व टिम सदरच्या परिसरामध्ये गस्त वाढविली. सायंकाळच्या सुमारास बिबट लोकांना पुन्हा दिसून आले असता वनविभागने केलेल्या सर्व टिम त्या भागांकडे रवाना झाले. यामध्ये सदरच्या प्राण्यास श्री.पांडूरंग राखुंडे यांच्या  केळीच्या शेतामध्ये झालेल्या कारवाईत वनविभाग व त्यांनी केलेल्या सर्व पथकांनी अंदाजे सायंकाळी 6.20 च्या सुमारास अंधुक वातावरणात बेशुध्द करण्याचा प्रयत्न असफल झाला. त्यासुमारास सदरच्या प्राण्यांने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता त्याला ठार मारण्यात आले. यानंतर जमा झालेला जमाव व वस्तुस्थिती पाहता पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी कार्यवाही करण्यात आली.   

यामध्ये सतत गस्त व शर्थीचे प्रयत्न, तंत्रज्ञानाचा वापर, टिम वर्क, करमाळावासीयांचे सहकार्य, लोकप्रतिनिधीचा सहभाग, पोलीस, ग्रामविकास, महसुल प्रशासनांची मदत, माध्यमांनी केलेली लोक जागरुकता यामुळे वनविभाग सदरच्या प्राण्याचा शोध घेवू शकला.

 यामध्ये मध्यभागी त्रिकोण व त्याच्या सभोवताली 7 ठिपक्यांचा समूह दिसून येत आहे. यामध्ये दोन पूर्ण अचूक सी (C) असून  त्यांच्यामध्ये विरुध्द दिशेने दोन सी (C) असलेली पाकळी आहेत. तसेच वनविभाग बीड यांनी मा.मुख्य वनसंरक्षक औरंगाबाद यांना दि. 30.11.2020 रोजी जा.क्र.अ/वन्यजीव/771/सन2020-21 यांनी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेरामध्ये घेतल्याचे नमुद केले आहे. दि.18.12.2020 रोजी मुख्य वनसंरक्षक औरंगाबाद व पुणे यांना मा.प्रधानमुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी वरती वर्णन केलेल्या बिबट या प्राण्यांस पिंजरा बंद करणे तसेच गरजेप्रमाणे तज्ञांच्या उपस्थितीत बेशुध्द करुन बंदोबस्त करणे अथवा पुढील मनुष्यहानी टाळण्यासाठी ठार मारण्याची परवानगी देण्यात आली होती.   

त्याअनुषंगाने मा. मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी वरील आदेशांचे तंतोतंत पालन करत आदेशानुसार कारवाई करत दि. 18.12.2020 रोजी अंदाजे 6.20 वा. मौजे बिटरगाव वांगी ता.करमाळा, जि. सोलापूर येथील कारवाई मध्ये जो बिबटया आढळला आणि ज्याच्यावर आज दि.19.12.2020 सिध्देश्वर वनविहार येथे शवविच्छेदन केले जात आहे, ते दोन्ही बिबटे तंतोतंत सारखे असल्याचे आढळले. माहितीस्तव शवविच्छेदनापूर्वी घेतलेला जिओ टॅग फोटोमध्ये मध्यभागी त्रिकोण व त्याच्या सभोवताली 7 ठिपक्यांचा समूह तसेच त्रिकोणाभोवती  दोन पूर्ण अचूक सी (C) असून  त्यांच्यामध्ये विरुध्द दिशेने दोन सी (C) असलेली पाकळी आहे. सोबत सदरचा फोटो जोडत आहे. याचबरोबर सदरच्या वन्यप्राण्याचे वनपरिक्षेत्रामध्ये सदरच्या कार्यवाही दरम्यान घेतलेले पायांचे ठसे, PIP आणि पंचनाम्यामध्ये आलेले पायांचे ठसे यामध्ये साम्यता आहे असे दिसून येते.

बिबट्याला ठार केल्यावर आमदार सुरेश धस म्हणाले..

अकलूजच्या ‘सिंहा’ने केला बिबट्याचा खात्मा-