Video : माजी मंत्री ढोबळे यांच्या मुलीसोबत टोल नाक्यावर उद्धट वर्तन

Video : माजी मंत्री ढोबळे यांच्या मुलीसोबत टोल नाक्यावर उद्धट वर्तन

सोलापूर : माजी मंत्री, शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या कोमल साळुंखे यांच्यासोबत आळेफाटा येथील टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांनी उद्धट वर्तन केल्याची घटना समोर आली आहे.

या संदर्भातील व्हिडिओ सौ. कोमल साळुंखे यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाने सौ. साळुंखे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे. ॲड. कोमल अजय साळुंखे या माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या असून शाहू शिक्षण संस्थेच्या संचालिका आहेत. सोबतच बहुजन रयत परिषद महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष आहेत.

Video - 

सौ. कोमल साळुंखे यांची पोस्ट -

‘बहुजन रयत परिषदेच्या जिल्हा अध्यक्षांचे दि: ११ डिसेंबर रोजी ह्रदय विकाराच्या झटक्याने अकस्मात निधन झाल्याने आज नाशिक येथील पिंपळगाव बसवंत येथे त्यांचा दशक्रिया विधि पार पडला. यासाठी मी पुण्यातून पहाटे ५ वाजता निघाले होते, हा विधी आटोपून परत पुण्याला येत असताना आळेफाटा टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अतिशय उद्धटपणे चुकीचे वर्तन केले. माझ्यासारख्या महिला पदाधिकारीला जर अशी वर्तणूक मिळत असेल तर माझी सामान्य माय-बहिण काय सहन करत असेल?
४०-रु च्या टोल साठी आपल्या पोटच्या मुलांच्या ओढीने जाणारी माऊली, आपल्या घरच्या ओढीने जाणारा सामान्य नागरिक, ६-६ महिने हजारो मैल प्रवास करणारे ट्रक ड्रायव्हर तासंतास हि मुजोरी का सहन करत आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील मावळा शांत का आहे? हे स्वराज्य कोणासाठी आहे? तमाम महाराष्ट्रातील बंधु-भगिनींनो आरक्षण आज नाही तर उद्या मिळेल. पण आपल्या माय बहिणींचा सन्मान आणि रक्षणाचं काय?????’