आमदार रोहित पवारांनी कार्यकर्त्याला भेट दिली चप्पल!

MLA Rohit Pawar News

आमदार रोहित पवारांनी कार्यकर्त्याला भेट दिली चप्पल!

MLA Rohit Pawar News

सोलापूर : तरुणांमध्ये आमदार रोहित पवार यांच्या विषयी मोठ्या प्रमाणात आकर्षण असल्याचे दिसून येत आहे. रोहित पवार यांच्या कार्यशैलीमुळे दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता वाढत आहे.

रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या एका कार्यकर्त्याला चप्पल भेट दिली आहे. विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांना यश मिळावे यासाठी थेरगाव येथील कार्यकर्ते राम बन्सी शिंदे यांनी चपलीचा त्याग केला होता. आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी शिंदे यांची भेट घेऊन सन्मानाने चप्पल भेट दिली.

आमदार रोहित पवार म्हणतात, ‘माझ्या आमदारकीसाठी माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांनी अनेक गोष्टींचा त्याग केला होता. त्यापैकीच थेरगाव इथले राम बन्सी शिंदे हे एक. निवडणुकीत मला यश मिळावं म्हणून त्यांनी चप्पल घालणं सोडलं होतं. त्यांची कृतज्ञतापूर्वक भेट घेऊन नवीन चप्पल दिली आणि त्यांचे आभार मानले.’

माझ्या आमदारकीसाठी माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांनी अनेक गोष्टींचा त्याग केला होता. त्यापैकीच थेरगाव इथले राम बन्सी...

Posted by Rohit Rajendra Pawar on Friday, 8 January 2021