जेनेलिया आणि रितेश प्रेग्नेंट; हसवण्यासाठी येत आहे ‘मिस्टर मम्मी’!

Mister Mummy Genelia And Ritesh Deshmukh

जेनेलिया आणि रितेश प्रेग्नेंट; हसवण्यासाठी येत आहे ‘मिस्टर मम्मी’!

Mister Mummy Genelia And Ritesh Deshmukh 

सोलापूर : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख Genelia And Ritesh Deshmukh हे लवकरच एका खास चित्रपटात एकत्रित दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव मिस्टर मम्मी Mister Mummy असे आहे.

रितेश आणि जेनेलिया यांनी आज आपल्या सोशल मीडिया हँडलवर मिस्टर मम्मी या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च केले आहे. हा चित्रपट विनोदी असणार असल्याचे यावरून दिसून येत आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रितेश आणि जेनेलिया हे दोघेही गरोदर असल्याचे दाखवण्यात आले आहेत. जेनेलिया हसत आहे मात्र रितेश तणावाखाली असल्याचे दिसून येत आहे.

मनापासून हसण्यासाठी तयार राहा आणि हसून तुमचं पोट दुखणार आहे असे पोस्टर मध्ये म्हटले आहे.

लवकरच मराठी चित्रपटात जेनेलिया दिसून येणार आहे. या चित्रपटाचे नाव वेद असे असणार आहे. रितेश देशमुख यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.