राज्यस्तरीय संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी मोहम्मद अयाज

राज्यस्तरीय संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी मोहम्मद अयाज

सोलापूर : म.सा.प.दामाजीनगर ,सुरसंगम ग्रुप व अ.भा.मराठी नाटय परिषद शाखा मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने 15 व 16 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलन होणार आहे.

यानिमित्ताने अध्यक्षांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. यात साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विटा येथील अक्षरयात्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रा.डॉ.स्वाती शिंदे-पवार यांची तर संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी सोलापूर येथील महाराष्ट्राचा महागायक विजेता मोहम्मद आयाज यांच्या निवडी करण्यात आल्या.


या बैठकीस संयुक्त संमेलनाचे अध्यक्ष प्रा.लक्ष्मणराव ढोबळे, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अ‍ॅड.नंदकुमार पवार, संगीत संमेलनाचे स्वागताध्यक्ष अ‍ॅड.सुजित कदम, म.सा.प.दामाजी नगरचे अध्यक्ष प्रकाश जडे, सुरसंंगम म्युझिकल ग्रुपचे प्रमुख दिगंबर भगरे यांचेसह डॉ.शरद शिर्के, लहू ढगे आदी प्रमुख संयोजक उपस्थित होतेे.