अनैतिक संबंधातून ब्लॅकमेल करायची; डोके फोडून केला खून

अनैतिक संबंधातून ब्लॅकमेल करायची; डोके फोडून केला खून

Murder Solapur Police News

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजे वीट ता. करमाळा येथील महिलेचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. आधी अनैतिक संबंध ठेवले आणि मग पैशांसाठी तिने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. शेवटी कंटाळून आरोपीने महिलेचा दगडाने डोके फोडून फोन केला.

दिनांक 17 फेब्रुवारी 2021 रोजी यातील मयत स्त्री ही रा. मौजे वीट ता. करमाळा जि. सोलापूर सकाळी 10ः45 वा. च्या सुमारास शेतात कामाकरीता गेली होती. मयत स्त्रीचा मुलगा शाळा सुटल्यानंतर शेताकडे जात असताना ओढयाजवळ त्याच्या आईचे चप्पल व स्कार्फ पडल्याचे दिसले. परंतू शोध घेवूनही आई कोठे दिसत नसल्याने  म्हणून त्याने वडिलास फोनव्दारे कळविले. त्यावरून वडिल तेथे आले दोघांनी मिळून तिचा शोध घेतला असता तेव्हा सकाळी 10ः45 वा. ते दुपारी 14ः45 वा. चे दरम्यान मौजे वीट ता. करमाळा येथील वीट ते मोरवड जाणारे जुन्या रोडजवळील ओढयाजवळ बाभळीच्या झाडाखाली झुडपाचे आडोशास तिस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून दगडाचे सहायाने डोक्यात मारून गंभीर जखमी करून तिला जिवे ठार केल्याचे दिसून आले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द करमाळा पोलीस ठाणे गुरंन 157/2021 भा.द.वि.का.क 302 प्रमाणे  गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हयाच्या घटनास्थळी पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अभिजित धाराशिवकर, श्री.विशाल हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडूळे व इतर पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या. 

सदरचा गुन्हा तत्काळ उघडकीस आणण्याकामी मा. पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि सर्जेराव पाटील यांनी त्यांचे नेतृत्वाखाली 03 पथके तयार करून त्यांना गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याकामी गावात तळ ठोकून योग्य ती माहिती संकलित करण्याकामी सुचना दिल्या होत्या. या गुन्ह्यात कोणत्याही प्रकारचा पुरावा नसताना स्था.गु.शा.सोलापूर ग्रामीण कडून नेमलेली 03 पथकास गावातून गोपनीय माहिती घेत असताना पथकास यातील मयत महीलेचा गावातील एका इसमासोबत वाद झाल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. त्यावरून तपास पथकाने सदर संशयीत इसमास ताब्यात घेवून त्याचेकडे व्यवसायिक व कौशल्यपूर्ण तपास केला असता, तो सतत विसंगत उत्तरे व माहिती देत होता. त्यावरून त्याचा अधिक संशय बळावल्याने त्यास अधिक विश्वासात घेवून व कौशल्यपूर्ण तपास करता त्याने वादावादीतून सदरचा गुन्हा केल्याची कबूली दिली आहे. 

ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी साततपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे, शाम बुवा, पोलीस उपनिरीक्षक अमित सिद पाटील, सफौ.खाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, राजेश गायकवाड, बिराजी पारेकर, श्रीकांत गायकवाड, मोहन मनसावाले, विजयकुमार भरले, सलिम बागवान, बापू शिंदे, रवी माने, लालसिंग राठोड, सचिन गायकवाड, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अजय वाघमारे, पांडूरंग काटे, चालक समीर शेख, केशव पवार यांनी बजावली आहे. 

या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीचे नाव धनाजी प्रभाकर काळे (वय 27) असे आहे. त्याचे मयत महिलेसोबत अनैतिक संबंध होते. ती महिला धनाजी यास ब्लॅकमेल करत होती. वारंवार पैशाची मागणी करायची. सुरुवातीला काही दिवस त्याने पैसे दिले. शेवटी कंटाळून त्याने दगडाने डोके फोडून तिचा खून केला अशी माहिती तपासात समोर आली आहे. चिडलेल्या धनाजी याने तिचा मेंदू बाहेर येईपर्यंत दगडाने मारहाण केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेनंतर 48 तासात हा गुन्हा उघडकीस आणला आहे. याबद्दल पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पथकाचे कौतुक केले आहे.