नाशिक ते सोलापूर सायकलिंगने सीपी हरीश बैजल यांना सल्युट!

नाशिक ते सोलापूर सायकलिंगने सीपी हरीश बैजल यांना सल्युट!

सोलापूर : नाशिक सायकलिस्ट  फाऊंडेशनचे संस्थापक हरीश बैजल सर हे पोलीस आयुक्त पदावरून आज 31 मे 2022  रोजी सेवानिवृत्त होत आहेत.

कर्तबगार पोलीस आयुक्त हरीश बैजल यांचा सेवानिवृत्तीच्या कार्यक्रम सोलापूर येथे आयोजित केला आहे.

नाशिकमध्ये हरीश बैजल पोलीस उपायुक्तपदी असताना सरांच्या  संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनची स्थापना झाली. सरांची  सायकलिंगची आवड व पर्यावरणाविषयीचे प्रेम अफाट आहे. त्यांच्या पोलीस दलातील सेवा कार्यास अनोखा सैल्युट देण्यासाठी नाशिक सायकलिस्टसच्या डॉ. मनिषा रौंदळ, नरेंद्र कंसारा, रतन अंकोलेकर, रामदास सोनवणे, अनुजा उगले व अनुज उगले  यांनी या 6 सदस्यांनी आज नाशिक ते सोलापूर 425 km  सायकल प्रवास केला.

Video -

आज दुपारी 1 वाजता पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी सर्व सायकललिस्टचे सोलापूर पोलीस आयुक्तालय येथे स्वागत केले.