कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी निसर्ग भ्रमंती

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी निसर्ग भ्रमंती

सोलापूर : कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने इको फ्रेंडली क्लबच्यावतीने 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी तिकोना किल्ला आणि देवकुंड धबधबा परिसरात निसर्ग भ्रमंतीचे आयोजन करण्यात आला आहे.

सविस्तर माहितीसाठी खालील इमेजवर क्लिक करा-

निसर्ग पर्यटन वाढावे यासाठी कार्यरत असलेल्या इको फ्रेंडली क्लबच्या आजवर हजारो सोलापूरकरांना पर्यटन घडविले आहे. महिलांच्या आग्रहावरुन कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दोन दिवसाच्या निसर्ग भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले आहे. 19 ऑक्टोबर रोजी शासकीय सुट्टी आहे. या दिवशी सकाळी तिकोना किल्ल्यावर भटकंती होईल. सायंकाळी ताम्हिणी घाट परिसरात टेंटमध्ये मुक्काम असेल. याच ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गाणी, गप्पांचे नियोजन आहे. यावेळी मसाला दुधाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

सविस्तर माहितीसाठी खालील इमेजवर क्लिक करा- 

20 ऑक्टोबर रोजी देवकुंड धबधबा आणि कुंडलिका नदी परिसरात भटकंती होणार आहे. या दोन दिवसीय निसर्ग भ्रमंतीची फी 2950 आहे. यात सोलापूर ते सोलापूर बसचा प्रवास, 2 वेळा चहा-नाश्ता, 4 वेळा जेवण, टेंटमध्ये मुक्कामाची व्यवस्था, गाईड, मेडीकल किटचा समावेश आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 8888856530 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.