‘नास ब्रॉडबॅण्ड’चे संस्थापक नवनाथ तोरणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

‘नास ब्रॉडबॅण्ड’चे  संस्थापक नवनाथ तोरणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Navnath Torane Birthday News

सोलापूर : नास ब्रॉडबॅण्ड प्रा. लि. आणि टेन जी प्रा. लि. चे संस्थापक नवनाथ तोरणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. टेलिकॉमसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तोरणे यांना प्रत्यक्ष भेटून, फोन करुन शुभेच्छा दिल्या.

शालेय जीवनात केबल बॉयपासून सुरु झालेला नवनाथ तोरणे यांचा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. आज नवनाथ तोरणे यांनी टेलिकॉम क्षेत्रात भरारी घेतली. सोलापूर, पुणे यासह राज्यात विविध जिल्ह्यात नास ब्रॉडबॅण्ड प्रा. लि. आणि टेन जी प्रा. लि. च्या माध्यमातून ब्रॉडब्रॅण्ड इंटरनेट आणि लीज लाईनची सेवा दिली जात आहे.

श्री. तोरणे यांच्या वाढदिवसानिमित्त नास ब्रॉडबॅण्डच्या सात रस्ता येथील मुख्य कार्यालयात कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी पुष्पहार घालून, पुष्पगुच्छ भेट देवून शुभेच्छा दिल्या. यावेळी नास ब्रॉडबॅण्डच्या संचालिका अश्विनी तोरणे, नरेश होसमनी, सुनील तोरणे यांनी कार्यालयातील सर्व सहकारी उपस्थित होते.

दूरसंचार विभागाचे संचालक आर.के.महेश्वरी, सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस उपअधीक्षक सुर्यकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी फोन करुन श्री. नवनाथ तोरणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. इंद्रधनु परिवाराकडून श्री. अंकुश कुंभार सर आणि सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनाथ भजनावळे, भारत पेट्रोलिअमचे सेफ्टी ऑफीसर विशाल चव्हाण यांच्यासह अनेकांनी प्रत्यक्ष भेटून श्री. तोरणे यांना शुभेच्छा दिल्या.

स्मार्ट सोलापूरकर डिजीटल मीडीयाचे संपादक परशुराम कोकणे आणि व्यवस्थापक अजित कोकणे यांनी नास ब्रॉडबॅण्डचे संस्थापक नवनाथ तोरणे यांना जास्वदाचे रोप देवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

श्री. नवनाथ तोरणे यांची मुलाखत पहा -