‘निसर्ग विहार’कडून गरीबांना मदतीचा हात

‘निसर्ग विहार’कडून गरीबांना मदतीचा हात

Nisarg Vihar Rahiwasi Sangh News

सोलापूर : होटगी रोड परिसरातील अपेक्स हॉस्पिटलमागील निसर्ग विहार परिसरात सुमारे शंभराहून अधिक कुटुंब राहतात. याठिकाणी सर्व धार्मिक सण, उत्सव एकत्रित साजरे केले जातात. यंदाच्या वर्षी जगावर कोरोना महामारीचे संकट आले आहे. मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्याने कामगार वर्ग व अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली. यासाठी परिसरातील कुटुंबांनी माणुसकीच्या नात्याने आर्थिक मदत केली. या मदतीमधून 21000 रुपये जमावण्यात आले. ही रक्कम प्रेरणा बहुद्देशीय सेवाभावी संस्था, सोलापूरच्या संस्थापक प्रमिला उबाळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. यामधून सुमारे 30 कुटुंबांना 15 दिवसाचे जीवनावश्यक समान देण्यात आले. त्याचप्रमाणे मागील वर्षी सांगली - कोल्हापूर महापुरला देखील वैद्यकीय समान पुरवण्यात आले. निसर्ग विहारचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ यांच्या पुढाकारातून आणि युवा मार्गदर्शक प्रतीक बावी यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी मुत्तुराज पट्टणशेट्टी, अथर्व भट, आदित्य पट्टणशेट्टी,समर्थ पाटील, सिध्दार्थ बिराजदार, श्रवण हलकुडे, ईशान चारी आदी युवा कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.

यांनी केली आर्थिक मदत - 
श्री.राहुल शर्मा,श्री. राजेंद्र मयनाळ,श्री.राजेंद्र कलशेट्टी,श्री.सूर्यकांत खटके,श्री.महादेव  बेळ्ळे,संजना नागटिळक,डॉ.राजेंद्र शहा,प्रतीक्षा गडगी ,डॉ. प्रियदर्शनी नारा,श्री.गितानंद वेरणेकर,प्रीती परगी,श्री. शकरराव धरणे,श्री. शिवकुमार पट्टणशेट्टी,श्री. रणजित नवले,श्री. अभिजित अधटराव,श्री. नीलकंठ चक्रदेव,मानसी भावर्थी,श्री.सतीश सदाफुले,श्री.महादेव व्हटकर श्री.एम.के.मित्तल, श्री.बी.बी.अगणुरे, श्री.दत्तात्रय डोके,श्री.सुदर्शन दास,सुधाकर व्हट्टे,अझद सैफन,वृदा रानडे,श्री. धनराज कडगंची, श्री.प्रतीक बावी, श्री.आदेश जगदनी,श्री.शामराव व्होटकर,शोभा शिदे,श्री.एस .सी.पाटील,श्री पराग भट,श्री.साच्चीदानंद व्होटकर,श्री. अरविंद बोरकर, श्री.दिवेश गुरबानी,प्रेमा कुंभार,पी.बी.मंगरूळे.